रेल्वे दुर्घटनेत अकराहुन जास्त लोकांचा जीव गेल्याचा प्राथमिक अंदाज, कुटुंबाला पाच लाखांची मदत जाहीर

रेल्वे दुर्घटनेत अकराहुन जास्त लोकांचा जीव गेल्याचा अंदाज, जखमींवर उपचार सुरू....
मृतकांच्या कुटुंबाला पाच लाख मदत जाहीर...
आग लागली, आग लागली अशी प्रवाशांची ओरड अन्..... रेल्वे अपघाताचा थरार ! आगीच्या भीतीने प्रवाशांनी पुष्पक एक्सप्रेसमधून मारल्या उड्या...
जळगाव, दि.22(डि-24 न्यूज) पाचोरा रेल्वे स्थानकाजवळ रेल्वे दुर्घटनेत अकराहुन जास्त लोकांचा जीव गेल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त केला जात आहे. अफवांना उत आला आहे. या वर्षातील जिल्ह्यातील हा पहिला अपघात आहे.
याबाबत माहिती मिळताच जिल्हा प्रशासनातील अधिकारी आणि रेल्वे अधिकारी, कर्मचारी घटनास्थळावर दाखल झाले.
जळगावहून मुंबईला जाणाऱ्या पुष्पक एक्सप्रेसला आग लागल्याच्या भीतीने काही प्रवाशांनी चालत्या गाडीतून उड्या मारल्या. आणि एकच गोंधळ उडाला.. मात्र, त्याचवेळी समोरुन येणाऱ्या बंगळुरु एक्सप्रेसने त्यांना चिरडल्याची दुदैवी घटना घडली आहे.
जळगावमधील परधाडे येथे हा दुर्दैवी अपघात झाल्याची माहिती आहे.
जळगावहून एक्सप्रेस निघाली होती, परधाडे गावाजवळ ट्रेन आली असता अचानक जोरात ब्रेक दाबल्यानंतर घर्षण होऊन ठिणग्या उडतात, तशा ठिणग्या उडाल्या होत्या.
तेव्हा ट्रेनमधील एका प्रवाशांने आग लागली, आग लागली असं बोलल्याने रेल्वेतील काही प्रवाशांनी ट्रेनमधून लगेच उड्या मारल्या अशी माहिती सूत्रांनी दिली आहे. मात्र, त्याचवेळी दुसऱ्या बाजुने बंगळुरु एक्सप्रेस येत होती त्या एक्सप्रेसखाली चिरडून प्रवाशांचा मृत्यू झाल्याची दुदैवी घटना घडली आहे.
या घटनेत अंदाजे 9 ते 10 लोकं रेल्वेखाली चिरडल्याचा अंदाज प्रत्यक्षदर्शींनी व्यक्त केला आहे. एकाच डब्यातील लोकांनी ह्या उड्या मारल्याचेही प्रत्यक्षदर्शींनी सांगितलंय.
दरम्यान, जळगावमधील आरपीएफ जवान, रेल्वे पोलीस आणि रेल्वे अधिकारी देखील घटनास्थळी रवाना झाले आहेत. जखमींना मदत कार्य सुरू झाले आहे .
रेल्वे प्रशासन आता घटनास्थळी पोहोचले आहे. घटनेचा पंचनामा तसेच मदतकार्य सुरू करण्यात आले.
जळगाव लोकसभा मतदार संघाच्या खासदार स्मिता वाघ याही घटनास्थळी रवाना झाल्यात. त्यांनीही प्रशासनातील अधिकाऱ्यांशी फोनवरुन संपर्क साधत सूचना केल्या आहेत. घटनास्थळी मंत्री गिरीश महाजन यांनी भेट देऊन अपघाताची माहिती दिली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस दावोसच्या दौ-यावर आहे. मृतांप्रती मुख्यमंत्र्यांनी शोकसंवेदना व्यक्त करुन मृतांना श्रध्दांजली अर्पण केली. मृतांच्या कुटुंबीयांना पाच लाख रुपयांची आर्थिक मदत देण्याची घोषणा करुन जखमींवर शासनाच्या वतीने मोफत उपचार केले जावेत असे निर्देशही त्यांनी दिले आहे. त्यांनी दुर्घटनेची माहिती दिली. दुर्घटनास्थळी मंत्री गिरीश महाजन पोहचून मदत व बचावासाठी आवश्यक गोष्टींचे व्यवस्थापन करत असल्याची माहिती त्यांनी दिली आहे. याबाबत मुख्यमंत्री फडणवीस यांनी दृकश्राव्य संदेश जारी केला आहे. हि घटना अत्यंत दुर्देवी असल्याचा उल्लेख करुन त्यांनी म्हटले आहे की काही लोकांचा मृत्यूची ही घटना अतिशय वेदनादायी आहे. जळगाव जिल्हा प्रशासन आणि रेल्वे प्रशासन समन्वयाने काम करीत असून जखमींच्या उपचारासाठी तातडीने व्यवस्था करण्यात येत आहेत. घटनास्थळी आठ रुग्णवाहिका रवाना करण्यात आल्या आहेत. सामान्य रुग्णालय तसेच नजीकच्या इतर खासगी रुग्णालयांना जखमींवर उपचारासाठी सज्ज ठेवण्यात आले आहे. ग्लासकटर, फ्लडलाईटस इत्यादी आपात्कालीन यंत्रणा सुध्दा सज्ज ठेवण्यात आले आहे. संपूर्ण स्थितीवर आम्ही लक्ष ठेवून असून आवश्यक ती मदत तातडीने पुरवण्यात येत आहे. जिल्हा प्रशासनाच्या संपर्कात असल्याबाबत मुख्यमंत्र्यांनी आश्वस्त केले आहे.
घटनास्थळी रुग्णवाहिका पोहोचल्या आणि मदत कार्य सुरू झालं आहे.. जिल्हा वैद्यकीय अधिकारी आणि रेल्वेचे अधिकारीही मदतीसाठी प्रयत्नशील आहेत.
जळगांव जिल्ह्यातील तीन रुग्णालयांना आपण सक्रीय राहण्याचे सांगितले आहे, असे जिल्हाधिकारी यांनी सांगितले.. ग्रामीण आणि जिल्हा रुग्णालयात जखमींना मदत करण्यात येत आहे. रुग्णालयात नातेवाईक यांची गर्दी झाल्याचे चित्र दिसत आहे. प्रांताधिकारी यांच्याकडून मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार 6 ते 8 जण रेल्वेखाली आल्याची माहिती आहे. दरम्यान या रेल्वे अपघाताच्या घटनेची बातमी जिल्ह्याभरात वाऱ्यासारखी पसरली असून ठिकठि
काणी चर्चा होत आहे.
What's Your Reaction?






