विजेचे प्रिपेड मिटर बसवले तर महावितरणच्या कार्यालयाला कुलूप लावण्याचा काँग्रेसचा इशारा...!

 0
विजेचे प्रिपेड मिटर बसवले तर महावितरणच्या कार्यालयाला कुलूप लावण्याचा काँग्रेसचा इशारा...!

विजेचे प्रिपेड मिटर बसवले तर महावितरणच्या कार्यालयाला कुलूप लावण्याचा काँग्रेसचा इशारा...

छत्रपती संभाजीनगर(औरंगाबाद), दि.23(डि-24 न्यूज) जुबली पार्क येथे महावितरण कार्यालयाचे मुख्य अभियंता पवन कुमार कचोट यांना अल्पसंख्यांक शहर जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष मोईन इनामदार यांच्या नेतृत्वाखाली स्मार्ट प्रीपेड मीटर बसवण्याची मोहीम तात्काळ थांबवण्यात यावी असे निवेदन देण्यात आले नसता लोकशाही मार्गाने सह व्यवस्थापक संचालक यांच्या कार्यालयाला कुलूप लावण्यात येईल असा सज्जड इशारा काँग्रेसच्या नेत्यांनी दिला.

 यामध्ये मुख्य अभियंता पवन कुमार कचोट यांनी सविस्तर माहिती दिली नाही व प्रश्नाचे उत्तर दिले नाही त्यांना अल्पसंख्याक काँग्रेस कमिटीच्या वतीने आठ दिवसाच्या आत स्मार्ट प्रीपेड मीटरची मोहीम थांबवण्यात यावी असा सज्ज इशाराही देण्यात आला नसता लोकशाही मार्गाने तुमच्या काँग्रेसच्या वतीने कार्यालयाला कुलूप लावून किंवा लोकशाही मार्गाने तीव्र आंदोलन करू असा इशारा दिला आहे. तसेच शहरांमध्ये ग्राहक वीज बिल भरून सुद्धा त्यांना वेळेवर 24 तास वीज मिळत नाही याबद्दल नागरिकांची व्यवसायाचे नुकसान होते हॉस्पिटलमध्ये रुग्णांचे हाल होतात नागरिकांना नाहक त्रास होतो. वेळोवेळी वीज बत्ती गुल झाल्याने त्रास सहन करावा लागतो नागरिकांना 24 तास वीज देण्याची ही निवेदनामध्ये विशेष नमूद केलेले आहेत. यामध्ये नागरिकांकडे जर महावितरण ने स्मार्ट प्रीपेड मीटर बसवले त्याला रिचार्ज करावे लागतात जोपर्यंत रिचार्ज असतो तोपर्यंत नागरिकांना वीज मिळते जर कोणी नोकरदार असेल किंवा मजदूर शेतकरी असेल त्याच्याकडे जर वेळेवर पैसे उपलब्ध नसेल तर त्याच्या घरातील वीज बंद होईल त्यात त्याला अंधारात राहावे लागेल आताचे जे मीटर आहेत यामध्ये नागरिकांनी बील भरण्यास विलंब झाला तरीही त्यांच्या घरामध्ये अंधार होत नाही हे आठवण करून देण्यात आली. यावेळी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे मार्गदर्शक प्रकाश मुगदिया, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस डॉ. जफर अहमद खान, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी अल्पसंख्याक विभागाचे प्रदेश उपाध्यक्ष इब्राहिम पठाण, मनपाचे माजी सभापती ॲड एकबालसिंग गिल, शहर जिल्हा काँग्रेसचे जेष्ठ नेते आकिफ रजवी, अल्पसंख्याक शहर जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष मोईन इनामदार, शहर जिल्हा काँग्रेस कमिटीचे कार्यअध्यक्ष डॉ. अरुण शिरसाट, अनिस पटेल, शहर जिल्हा काँग्रेस कमिटीचे अल्पसंख्यांक काँग्रेस कमिटीचे प्रदेश पदाधिकारी जावेद पठाण, शहर जिल्हा काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस सौ मंजुताई लोखंडे, प्रमोद सदाशिव, रवी लोखंडे, मजाज अझहर शेख, प्राध्यापक पद्माकर कांबळे, आनंद दाभाडे, प्राध्यापक शीलवंत गोपनारायण, फराज आबेदी, शहबाज कादरी, संजय जाधव, मीनाज शब्बीर पटेल आदी पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow