डॉ.गफ्फार कादरी यांना निवडून देण्याचे अबु आसिम आझमी यांचे मतदारांना आवाहन

 0
डॉ.गफ्फार कादरी यांना निवडून देण्याचे अबु आसिम आझमी यांचे मतदारांना आवाहन

डॉ.गफ्फार कादरी यांना निवडून देण्याचे अबु आसिम आझमी यांचे आवाहन....

भोंग्यावर राजकारण करणाऱ्या भाजपा व मनसेची सत्ता येणार नाही, वोट जिहादला दिले उत्तर, जिहाद म्हणजे जीव घेणे नाही तर संघर्ष म्हणजे जिहाद...

छत्रपती संभाजीनगर(औरंगाबाद), दि.10(डि-24 न्यूज) औरंगाबाद पूर्व विधानसभा मतदारसंघातून समाजवादी पक्षाचे उमेदवार डॉ.गफ्फार कादरी यांना मोठ्या मताधिक्याने निवडून आणा असे आवाहन मतदारांना समाजवादीचे प्रदेशाध्यक्ष अबू असिम आझमी यांनी केले आहे. त्यांनी पत्रकार परिषदेत पुढे सांगितले डॉ.कादरी हे मागच्या विधानसभा निवडणुकीत थोड्या मताने पराभव झाला होता. ते ज्या पक्षात होते तेथे त्यांच्यावर अन्याय झाला त्यांना उमेदवारी नाकारली म्हणून त्यांचे सामाजिक कार्य बघता समाजवादी पक्षाने धीर देत उमेदवारी दिली. या मतदारसंघात मैत्रिपूर्ण लढतीत डॉ.कादरी यांचा विजय होईल. ते जिंकण्यासाठी उभे आहे. मतदारांचा त्यांना प्रतिसाद मिळत आहे. 

मनसे व भाजपाच्या वतीने सरकार आली तर मस्जिदचे भोंगे काढणार असे वक्तव्य येत आहे असे एका धर्माला टार्गेट करणारे पक्षाला मतदार नाकारतील व 175 ते 180 जागा महाविकास आघाडीचे निवडून येईल व सरकार बणणार असा विश्वास आझमींनी व्यक्त केला. देवेंद्र फडणवीस यांनी वोट जिहादच्या विरोधात धर्मयुद्ध करा याला उत्तर देताना आझमींनी सांगितले जिहादचा अर्थ यांना अजून कळलाच नाही. जिहाद म्हणजे जीव घेणे नाही तर संघर्ष करणे आहे. अन्यायाला वाचा फोडने म्हणजे जिहाद आहे. भाजपाने एकही तिकीट मुस्लिम समाजाला दिले नाही मंत्री केले नाही. एक है तो सेफ है, कटेंगे तो बचेंगे असे नारे देणा-यांनी एकही मुस्लिम लोकसभा व विधानसभेत उमेदवार दिला नाही. मंत्री बणवले नाही. दोन धर्मात तेढ निर्माण करायचे व राज्य करायचे यांचे मनसुबे आहे यांना जनता आपली जागा दाखवेल व महाविकास आघाडीने पाच गॅरंटीची घोषणा केली आहे. लाडकी बहीणीला तीन हजार रुपये प्रति महिना, बेरोजगारांना चार हजार रुपये महीना, 25 लाखांचा आरोग्य विमा व मोफत औषधी, शेतकऱ्यांना कर्जमाफी व विविध योजना देण्याचे आश्वासन दिले ते सरकार आले तर पूर्ण करणार. मनोज जरांगे पाटील यांच्या मराठा आरक्षण आंदोलनाला पाठिंबा आहे. त्यासोबतच मुस्लिम आरक्षणाची मागणी आहे. समाजवादी पार्टी त्यांच्या मागणीसाठी त्यांच्या सोबत असेल. आंतरवाली सराटी येथे झालेल्या लाठीचार्ज करणा-यांवर कार्यवाही केली नाही. विशालगडासारखी घटना घडू नये. धार्मिक ग्रंथाचा अपमान व महापुरुषांच्या विरोधात वक्तव्य करणाऱ्या विरोधात गरळ ओकणारे विरोधात युएपिए कायद्या अंतर्गत कारवाई झाली पाहिजे अशी मागणी त्यांनी केली. दोन जागेवर महाविकास आघाडी व सहा ठिकाणी मैत्रीपूर्ण लढत आहे एकुण आठ जागेवर समाजवादीचे उमेदवार रिंगणात आहेत असे आझमींनी सांगितले.

यावेळी प्रदेश सचिव अब्दुल सचिव अब्दुल रऊफ, शहराध्यक्ष फैसल खान यांची उपस्थिती होती.

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow