सत्ता आणायची असेल तर घरी बसून चालणार नाही, जनतेमध्ये जाऊन काम करा- प्रदेशाध्यक्ष नाना पटोले
काँग्रेस पक्षाला सत्त्तेत आणण्यासाठी आतापासूनच कामाला लागा - प्रदेशाध्यक्ष नाना पटोले
उदयपूर येथे झालेल्या राष्ट्रीय अधिवेशनात ज्या पद्धतीने पक्षाची बांधणी करायची होती ती झाली का नाही याचा आढावा बैठकीत घेण्यात आला. दोन महिन्यांचा अवधी ग्रामीण आणि शहरातील पदाधिकारी यांनी बूथ कमिट्या स्थापन करण्याचे दिले आदेश...
औरंगाबाद, दि.10(डि-24 न्यूज) महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी विभाग निहाय बैठकीचे आयोजन शहरात केले होते. यामध्ये मराठवाडा विभागाची बैठक आज औरंगाबाद येथे घेण्यात आली. यामध्ये सकाळी 10.30 वाजता शहर व जिल्हा काँग्रेस कमिटीची आढावा बैठक घेण्यात आली. यामध्ये बुथ कमिटया, मंडळ अध्यक्ष, ब्लॉक अध्यक्ष, तालुका अध्यक्ष, यांना काँग्रेस पक्षाला सत्त्तेत आणण्यासाठी आतपासुनच कामाला लागा असे प्रांताध्यक्ष नान पटोले यांनी मार्गदर्शन केले.
त्यांनी यावेळी पदाधिकारी यांना खडसावले, तुझे तू बघ हे आता चालणार नाही, पदे घेऊन घरी बसने चालणार नाही बाहेर पडावे लागेल, जनतेच्या अडचणी व समस्या जाणून घेतल्या पाहिजेत. जनतेमध्ये जाऊन जनतेची कामे केली तरच सत्ता येऊ शकते मरगळ आता झटकून टाका, गट तट चालणार नाही, निवडणूका जिंकण्यासाठी पक्षाची ध्येय धोरणे, पक्षाचे आदेश पाळावे लागतील.
या कार्यकमाचे अध्यक्ष तथा आ. नाना पटोले, माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण साहेब, माजी मंत्री आरेफ नसीम खान, माजी मंत्री अमित देशमुख, प्रदेश उपाध्यक्ष एम.एम.शेख, माजी मंत्री अनिल पटेल आदी मान्यवर उपस्थित होते. सर्व प्रथम शहर व ग्रामीण काँग्रेस कमिटीच्या वतीने जिल्हा अध्यक्ष मा.आ.डॉ.कल्याण काळे व शहर जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष शेख युसूफ यांनी मान्यवरांचे मोठया हाराने स्वागत करण्यात आले.
प्रदेश सरचिटणीस डॉ.जफर अहेमद खान, किरण पाटील डोणगांवकर, अनिस पटेल, भाउसाहेब जगताप, डॉ.अरुण शिरसाठ, डॉ.निलेश अंबेवाडीकर,शेख रईस, शेख कैसर बाबा, आसमत खान, उमाकांत खोतकर, सयद फैयाजोददीन, सलीम खान रवि लोकांडे,आदी पदाधिकारी उपस्थित होते.
What's Your Reaction?