मनपाने खरेदी केली ड्रेनिज चोकअप काढण्यासाठी पाॅवर राॅडींग मशिन व ट्राय पाॅड सेट

 0
मनपाने खरेदी केली ड्रेनिज चोकअप काढण्यासाठी पाॅवर राॅडींग मशिन व ट्राय पाॅड सेट

नवीन मशिनरी, वाहनांचे उदघाटन...

औरंगाबाद, दि.18(डि-24 न्यूज) महानगरपालिका ड्रेनेज विभागासाठी खरेदी करण्यात आलेले 3 पावर रॉडिंग मशीन, 9 ट्राय पॉड सेट आणि अतिक्रमण विभागासाठी खरेदी केलेले दोन ट्रक यांचे उदघाटन महानगरपालिका आयुक्त तथा प्रशासक जी श्रीकांत यांच्या हस्ते काल संध्याकाळी स्मार्ट सिटी कार्यालय परिसरात करण्यात आले. 

यावेळी अतिरिक्त आयुक्त रणजीत पाटील, सौरभ जोशी, शहर अभियंता ए. बी. देशमुख, कार्यकारी अभियंता (यांत्रिकी) अमोल कुलकर्णी, बी डी फड, आर एन संधा, के एम फालक, फारुख खान व इतर विभागप्रमुख, उप अभियंता आणि अधिकारी यांची उपस्थिती होती.

पॉवर रॉडिंगचे प्रात्यक्षिक यशस्वी

आज दि 18 नोव्हेंबर रोजी नवीन खरेदी करण्यात आलेले पॉवर रॉडिंगचे प्रत्येक्ष यशस्वीरीत्या पार पडले.

 महानगरपालिका आयुक्त तथा प्रशासक जी श्रीकांत यांचे समक्ष एसएससी बोर्ड ते पीर बाजार रस्त्या वरील मुख्य ड्रेनेज लाईनचे चोकअप काढण्याचे प्रात्यक्षिक यशस्वीपणे करण्यात आले.

सदरील पॉवर रॉडिंग मशीन टाटा एस वर चढून आशा प्रकारचे 3 वाहने महापालिकेच्या ताफ्यात शामिल झाल्या आहेत. 10 एच पी चे इंजिन असणारे या वाहनाची प्रत्येकी किमत 9 लाख रुपये इतकी आहे. बद्दी मारून ड्रेनेज चोक अप काढण्याची जुनी पद्धतीला सदरील तंत्रज्ञानाने यशस्वीरीत्या बदलले आहे. 

पॉवर रॉडच्या तोंडाला वेगवेगळ्या प्रकारचे चोक अप काढण्यासाठी किमान 5 अटेचमेन्ट देण्यात आले आहेत. 

सदरील माशीनबाबत वॉर्ड अभियंत्यांचे अभिप्राय घेऊन प्रत्येक झोनला एक पॉवर रॉडिंग मशीन उपलब्ध करून देण्यात येईल. 

यावेळी शहर अभियंता ए. बी.देशमुख, कार्यकारी अभियंता(यांत्रिकी) अमोल कुलकर्णी, उप अभियंता डी के परदेशी व इतर अधिकाऱ्यांची उपस्थिती होती.

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow