बिबट्या आतापर्यंत वनविभागाच्या हाती लागला नाही, उप वनसंरक्षक सुर्यकांत मंकावार यांचे नागरीकांना सतर्क राहण्याचे आवाहन
बिबट्या आतापर्यंत वनविभागाच्या हाती लागला नाही, उप वनसंरक्षक सुर्यकांत मंकावार यांचे नागरीकांना सतर्क राहण्याचे आवाहन
छ.संभाजीनगर(औरंगाबाद) दि.20(डि-24 न्यूज) 17 जूलै रोजी प्रोझोन माॅल, एन-1 याठिकाणी सिसिटीवी फुटेजमध्ये बिबट्या आढळला होता. त्यानंतर तो दिसून आला नाही. 60 जणांची 15 पथके ज्यामध्ये आर्मी इको बटालियन, वन विभाग, नाशिक वनविभाग टिम, महसूल व पोलीस त्याच्या मागावर आहेत. एन-1 मध्ये दहा टक्क्यांहून अधिक उद्योग स्थलांतर झाल्याने उद्योग बंद असल्याने बिबट्याला लपण्यासाठी वाव आहे. पळशी व सारोळा वन जंगलाकडे तो बिबट्या गेल्याचे दिसून येत आहे तरीही नागरीकांनी सतर्क राहावे. लहान बालके व जेष्ठ नागरिकांना रात्रीच्या वेळी बाहेर फिरु नये. बिबट्या आढळला तर वन विभागाला किंवा पोलिसांना त्वरीत कळवावे. बिबट्याची शोधमोहीम जोमाने सुरू आहे नागरीकांनी घाबरू नये. सोशल मीडियावर अफवा पसरवणारे पोस्ट, फोटो, व्हिडिओ व्हायरल केले जात आहे. यामध्ये तथ्य नाही नागरीकांमध्ये गैरसमज पसरण्यासाठी अफवा पसरवल्यास संबंधितांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल असे आवाहन उप वनसंरक्षक सुर्यकांत मंकावार यांनी एक व्हिडिओ प्रकाशित करुन केले आहे.
What's Your Reaction?