काँग्रेस नेत्यांच्या विरोधात फेक नेरेटीव्ह पसरवून दिशाभूल, काँग्रेसने प्रवक्त्यांची टिम मैदानात
काँग्रेस नेत्यांच्या विरोधात फेक नेरेटीव पसरवून दिशाभूल, काँग्रेसने प्रवक्त्यांची टिम मैदानात
मुंबई, दि.20(डि-24 न्यूज) फेक नेरेटीव्ह पसरवून राज्यातील जनतेची दिशाभूल करण्याचे काम सुरू आहे. आयटीसेल विरोधी पक्षांच्या नेत्यांचे फोटो, व्हिडिओ एडिट करून मोठ्या प्रमाणात फेक न्यूज पसरवत असल्याने जनतेसमोर सत्य आले पाहिजे खोट्या प्रचाराला पायबंद घालण्यासाठी महाराष्ट्राचे प्रभारी रमेश चेन्नीथला यांच्या निर्देशानुसार महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीने प्रवक्त्यांची टिम मैदानात उतरवली आहे. ते प्रवक्ते आपली भूमिका माध्यमांसमोर मांडतील असे प्रसिध्दीपत्रकात प्रदेश उपाध्यक्ष नाना गावंडे यांनी म्हटले आहे.
प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, विरोधीपक्षनेते विजय वडेट्टीवार, माणिकराव ठाकरे, आरिफ नसीम खान, आ. डॉ.नितिन राऊत, आ.अमित देशमुख, मुख्य प्रवक्ते अतुल लोंढे, चरणसिंग सप्रा, आ.बाळासाहेब थोरात, आ.पृथ्वीराज चव्हाण, आ.सतेज उर्फ बंटी पाटील, खा.चंद्रकांत हंडोरे, आ.अॅड यशोमती ठाकूर, आ.डाॅ. विश्वजीत कदम, सचिन सावंत यांची नियुक्ती केली आहे.
What's Your Reaction?