बागेश्वर बाबांनी चमत्कार सिध्द करावे अन्यथा दरबार बंद करा, अंनिस देणार 30 लाखांचे बक्षीस

 0
बागेश्वर बाबांनी चमत्कार सिध्द करावे अन्यथा दरबार बंद करा, अंनिस देणार 30 लाखांचे बक्षीस

चमत्कार सिद्ध करा अन्यथा दिव्य दरबार बंद करा... चमत्कार सर्वांसमक्ष दाखविल्यास 30 लाखांचे बक्षीस...

औरंगाबाद, दि.8(डि-24 न्यूज) बागेश्वरच्या धीरेंद्र शास्त्रींना अंनिसचे 30 लाखांचे आव्हान

सध्या... बागेश्वर धामचे धीरेंद्र कृष्ण शास्त्री श्रीराम कथा प्रवचनासाठी औरंगाबाद येथे आलेले असून कथा प्रवचन करण्याचा त्यांना अधिकार आहे पण प्रवचनाच्या नावाखाली दिव्य दरबार भरवितात त्यात दिव्यशक्ती असते, चमत्कार होतात, आपण कुणाचेही नाव, वय, आजार आणि मनातील ओळखू शकतो, मोबाईल नंबर सांगू शकतो,असा दिव्य दावा करतात. आजवर त्यांनी त्यांच्या दिव्य व प्रेत दरबारात केलेले चमत्कार फसवणूक मुक्त स्थितीत

सिद्ध करा आणि अखिल भारतीय अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे रुपये तीस लाखाचे बक्षीस जिंका अन्यथा राम कथेच्या नावावर दिव्य चमत्कार करून लोकांची फसवणूक दिशाभूल करणारा दिव्य दरबार थांबवा, असे आवाहन. अ. भा. अंनिस चे मराठवाडा संघटक किशोर वाघ यांनी केले.

अंनिसवाल्यांनी मला कधीही आव्हान दिलेले नसून मी सध्या महाराष्ट्रात आहे त्यांनी दरबारात चर्चेसाठी, या असे धीरेंद्र शास्त्रींनी पत्रकार परिषदेत सांगितल्यावर अ. भा. अंनिस वतीने पत्रकार परिषद घेऊन त्यांना पुन्हा तीस लाखाचे आव्हान देण्यात आले.

समितीने यापूर्वीच त्यांच्याविरुद्ध जादूटोणाविरोधी कायदा आणि द ड्रग्स अँड मॅजिक रेमेडीज कायद्यानुसार कार्यवाही करण्याची मागणी नागपूर मुंबई ई. ठिकाणी रीतसर तक्रार करून आणि वकीला मार्फत नोटीस पाठवून केलेली आहे.

जर धीरेंद्र शास्त्रींनी फसवणूक मुक्त स्थितीमध्ये 10 लोकांचे नाव वय मोबाईल नंबर सांगितल्यास त्यांना तीस लाख रुपये बक्षीस देऊन गेल्या 41 वर्षापासून देवाधर्माला विरोध न करता जनसामान्यांची लुबाडणूक आणि फसवणूक करणाऱ्या विरुद्ध जनजागरण करण्याचे संत आणि समाज सुधारकांचे प्रबोधन कार्य करणारी आपली अंनिस चळवळ बंद करून बाबाच्या पायावर डोके टेकवू अन्यथा देवाधर्माच्या आणि कथेच्या नावावर जनसामान्याची फसवणूक लुबाडणूक करणा-यांना जनतेसमोर उघडे केल्याशिवाय आणि जनजागरण केल्याशिवाय आम्ही शांत राहणार नाही.

या वेळी अ.भा. अंनिसचे पंकज देशमुख जिल्हा संघटक, वनिता दाटे, महिला संघटक रविंद्र वाकोडे जिल्हाध्यक्ष, रावसाहेब जारे, जिल्हा सचिव यांची प्रमुख उपस्थिती होती.

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow