बागेश्वर बाबांना अंनिसचे चर्चेचे आव्हान, आव्हान स्वीकारल्याचे लेखी देण्याची मागणी

 0
बागेश्वर बाबांना अंनिसचे चर्चेचे आव्हान, आव्हान स्वीकारल्याचे लेखी देण्याची मागणी

बागेश्वर बाबांनना महा. अंनिसचे आव्हान स्वीकारल्याचे लेखी द्यावे नियंत्रित ठिकाणी महा. अंनिस चर्चेसाठी तयार...

काल झालेल्या पत्रकार परिषदेत अंधश्रद्धा निर्मूलन समितीसोबत चर्चा करण्यास तयार असल्याचे बागेश्वर बाबा यांनी सांगितले होते...ते आव्हान अंनिसने स्विकारले आहे ....

औरंगाबाद, दि.7(डि-24 न्यूज) बागेश्वर बाबा उर्फ धीरेंद्र कृष्ण शास्त्री यांना ते जाहीर कार्यक्रमात करीत असलेल्या चमत्कार सदृश्य दावे, दुर्धर, असाध्य रोग दुरुस्त करण्याचा दावा संत तुकाराम यांचे विषयी आक्षेपार्ह विधान, फलज्योतिष, धर्मनिरपेक्ष राष्ट्रात ही मनुस्मृतीचे उघडउघड समर्थन हे आधुनिक विज्ञान कसोट्यांच्या आधारे सिद्धता देण्याचे महाराष्ट्र अंनिसचे एकवीस लाखाचे जाहीर आव्हान स्वीकारल्याचे लेखी द्यावे. महाराष्ट्रात नियंत्रित ठिकाणी महा. अंनिस चर्चेस तयार आहे.

महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचा देव आणि धर्माला विरोध नाही पण देव आणि धर्माच्या नावावर होणाऱ्या शोषणाला मात्र विरोध आहे. भारतीय राज्यघटनेने प्रत्येक नागरिकाना वैयक्तिक श्रद्धा, उपासना व धर्मपालनाचे स्वातंत्र्य जरूर दिले आहे. ते चार भिंतीच्या आत. सार्वजनिक आरोग्य आणि कायदा सुव्यवस्था बाधित होत असेल तर त्याला निर्बंध ही घातलेले आहेत. महाराष्ट्र अंनिस त्याचा आदर करते.

देवाधर्माच्या अध्यात्माच्या नावाने जर कोणी लोकांच्या अज्ञांनाचा, अगतिक्तेचा गैर फायदा घेवून समाजाची दिशाभूल फसवणूक करून विविध प्रकारे शोषण करीत असेल आणि मानसिक गुलामगिरी लादत असेल तर तर महाराष्ट्र अंनिस त्याला नेहमीच विरोध करीत आलेली आहे. अशा भोंदूबुवांना अंनिसने नेहमीच रू. 21 लाखांचे आव्हान दिले आहे. महा. अंनिसच्या आव्हानप्रक्रिये प्रमाणे आव्हान स्वीकारून त्यांनी वैज्ञानिक कसोट्यांवर त्यांचे दावे सिद्ध करून रू. 21 लाखाचे बक्षीस स्वीकारावे.

देशात केंद्र शासनाचा ड्रगज अँड मॅजिक रेमिडीज अडव्हरटाइजमेन्ट ऑब्जेक्श नेबल अॅक्ट 1954 व राज्यात मागील दहा वर्षांपूर्वी जादूटोणाविरोधी कायदा लागू असताना सर्रास या कायद्याचे उल्लंघन केले जात असल्याचे मत महा. अंनिसने मांडले आहे. त्याचे हे दावे राज्यघटनेतील वैज्ञानिक दृष्टिकोन या मूल्याशी पूर्णपणे विसंगत असून, महाराष्ट्रातील जादूटोणाविरुद्ध कायद्याचे सर्रास उल्लंघन करणारे आहेत. समाजाची दिशाभूल व शैक्षणिक धोरणाच्या विरोधात आपण वक्तव्य करतात, असे महाराष्ट्र अंनिसचे ठाम मत आहे.

औरंगाबाद शहरात कालपासून धीरेंद्र कृष्ण शास्त्री यांचा कार्यक्रम चालू आहे. त्यात त्यांनी महाराष्ट्र अंनिस समोर आली नाही असे सांगितल्याचे समजते. तत्पूर्वीच महाराष्ट्र अंनिसच्या वतीने मागील आठवड्यातच शहराचे पोलीस प्रशासन आणि प्रमुख संयोजक यांच्या माध्यमातून धिरेंद्र कृष्ण शास्त्री याना आव्हानाचे सविस्तर लेखी आव्हान देण्यात आले आहे. त्यांनी ते आव्हान स्वतः स्वीकारून तसे चर्चेसाठी तयार असल्याचे लेखी निवेदन द्यावे ही चर्चा महाराष्ट्रात नियंत्रित स्थळी गठीत समितीसमोर होईल. या समितीत जिल्हाधिकारी जिल्हा पोलिस अधीक्षक, शिक्षण तज्ज्ञ, शास्त्रज्ञ, संत विचाराचे अभ्यासक, पत्रकार प्रतिनिधी, धीरेंद्र शास्त्री व महा. अंनिस चे मर्यादित प्रतिनिधी यांचे उपस्थितीत महा. अंनिस चर्चेला तयार आहे.

प्रशासन व संयोजक यांना पूर्व निवेदन दिल्यानंतर कार्यक्रम होतोच आहे तर त्यांनी त्या संपूर्ण कार्यक्रमाचे व्हिडिओ शूटिंग करून, ते शूटिंग जाहीर करावे. त्यातील चमत्कार सदृश्य दाव्यांविरोधात त्यांच्यावर जादूटोणाविरोधी कायद्याअंतर्गत कडक कायदेशीर कारवाई करावी. त्यासाठी महाराष्ट्र अंनिस पुन्हा महाराष्ट्र अंनिस पोलीस प्रशासनाकडे आग्रह धरीत आहे.

प्रसिध्दीपत्रकात 

माधव बावगे राज्य कार्याध्यक्ष,

संजय बनसोडे,

गजेंद्र सुरकार,

नंदकिशोर तलाशीलकर,

डॉ. ठकसेन गोराणे

सर्व राज्य प्रधान सचिव,

अॅड. मनीषा महाजन ॲड. तृप्ती पाटील

कायदा व्यवस्थापन विभाग.

ॲड. गोविंद पाटील

विष्णू लोणारे

बुवाबाजी विरुद्ध संघर्ष विभाग,

डॉ. रश्मी बोरीकर,

शहाजी भोसले,

भास्कर बनसोडे,

प्रशांत कांबळे यांची नावे व सही आहे.

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow