बिबट्याचा वनसंरक्षकावर हल्ला, उपचारासाठी घाटीत, शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण

 0
बिबट्याचा वनसंरक्षकावर हल्ला, उपचारासाठी घाटीत, शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण

बिबट्याचा वनसंरक्षकावर हल्ला, शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण

फुलंब्री,दि.10(डि-24 न्यूज) फुलंब्री तालुक्यातील पानवाडी-चिंचोली बु. येथील जंगलात बिबट्याने वनसंरक्षकावर हल्ला केल्याने खळबळ उडाली आहे. या हल्ल्यात वनसंरक्षक विजय कुंटे जखमी झाले असल्याने डोक्याला दुखापत झाली असल्याने सामान्य रुग्णालयात उपचार केल्यानंतर घाटी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. या घटनेनंतर शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. शेतात दिवसा वीज पुरवठा होत नसल्याने रात्र पाळीत बारी द्यायला जावे लागते पण बिबट्याच्या वावराने भीती पसरली आहे. वैजापूर, गंगापूर व अन्य तालुक्यातील जंगलात बिबट्याचा वावर वाढला असल्याने वन विभागाने दक्षता घ्यावी अशी मागणी शेतकऱ्यांकडून होत आहे. शेतकऱ्यांना दिवसा वीज पुरवठा व्हावा अशीही मागणी लोकप्रतिनिधी यांनी हिवाळी अधिवेशनात करावी अशी मागणी सुध्दा केली जात आहे. बिबट्याचा शोध घेताना हि घटना घडली पण बिबट्याला आवर घातला नाही तर आणखीन अशा घटना घडू शकतात. सावंगी जवळ बिबट्याचे कारमधून दर्शन झाले असल्याचा एक व्हिडिओ व्हायरल झाला आहे. फुलंब्री तालुक्यातील झालेल्या घटनेचा सुध्दा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow