पोलिस का बनले पतसंस्था घोटाळ्याचे गुंतवणूकदार...! आरोपीला पकडून आणले पोलिस आयुक्तालयात

 0
पोलिस का बनले पतसंस्था घोटाळ्याचे गुंतवणूकदार...! आरोपीला पकडून आणले पोलिस आयुक्तालयात

पोलिस का बनले पतसंस्था घोटाळ्याचे गुंतवणूकदार...! आरोपीला पकडून आणले पोलिस आयुक्तालयात

औरंगाबाद,दि.10(डि-24 न्यूज) आदर्श घोटाळा, अजिंठा अर्बन घोटाळा आणि आता ज्ञानोबा अर्बन क्रेडिट सोसायटी पतसंस्थेतील गुंतवणूकदारांनीच पोलीस बनत एका आरोपीला पकडून पोलीस आयुक्त कार्यालयात पोलिसांच्या स्वाधीन केले आहे.

रात्री 11 ते 12 वाजेच्या दरम्यान फरार असलेला आरोपी पतसंस्थेतील मॅनेजर सोमनाथ नरवडे याला बेंबडे हाॅस्पीटलजवळ आढळून आल्याने गुंतवणूकदारांनी पकडून पोलिसांच्या ताब्यात दिले आहे त्याला पोलिसांनी मेडीकलसाठी नेले आणि दिडशे ते दोनशे गुंतवणूकदारांचा जमाव घरी परतला. स्वप्नील ताक, तुषार लवाळे पाटील यांनी यावेळी माहिती दिली की ज्ञानोबा क्रेडिट सोसायटी, कामगार चौक, एन-१ सिडको पतसंस्थेतील घोटाळा ऑक्टोबर महिन्यात उघड झाले त्यानंतर संचालक मंडळावर मुकुंदवाडी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. सर्व आरोपी फरार आहे त्यापैकी आज एक आरोपी मिळाला आहे. दिड ते दोन हजार गुंतवणूकदारांच्या 70 ते 80 कोटींच्या ठेवी आहे. गुंतवणूकदारांपैकी देशाच्या सीमेवर देशाचे रक्षण करणारे 80 टक्के एक्स आर्मी मॅन आहे. लवकर सर्व आरोपींना पोलिसांनी अटक करावी गेली 70 दिवसांपासून आरोपी मिळत नव्हते यामुळे गुंतवणूकदार हवालदिल झाले आहेत. पोलिस व डिडिआर कार्यालयाकडून चौकशी सुरू असल्याचे म्हटले जात आहे. गुंतवणूकदारांचे कष्टाचे पैसे लवकर मिळावे यासाठी पोलीस प्रशासनाने तातडीने पावले उचलून न्याय मिळवून द्यावा अशी मागणी त्यांनी यावेळी केली आहे. या प्रकरणात बोलण्यासाठी पोलिस अधिकारी उपलब्ध झाले नाही.

या प्रकरणात आणखी एक माहिती समोर येत आहे भरघोस परताव्याचे अमिष दाखवत गुंतवणूकदारांची कोट्यावधी रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी मे.आभा इनवव्हेस्टमेंट अॅड डेव्हलोपर्सच्या संचालकां विरोधात 4 ऑक्टोबर रोजी एमआयडीसी पोलिस ठाण्यात रवी तुकाराम वीर यांच्या फिर्यादीवरून पंकज शिवाजीराव चंदनशिव, पत्नी प्रियंका चंदनशिव यांच्यासह साक्षीदार सोमिनाथ चंदनशिव, शिवाजी रोडे, सोमिनाथ नरवडे यांच्या विरोधात दोन कोटी तीस लाख रुपयांची फसवणूक केली म्हणून गुन्हा दाखल केला होता. तांत्रिक तपास करीत मुख्य आरोपी विरोधात पोलिसांनी तपास सुरू केला होता. नरवडेला नोटीस बजावली होती. पोलिस बोलावतील तेव्हा तो हजर राहत होता पण पोलिसांनी त्याला अटक केली नाही त्याला गुंतवणूकदारांनी चोप देत पोलिसांच्या स्वाधीन केले त्याला उपचारासाठी घाटी रुग्णालयात दाखल केले आहे. कार्यवाही होत नसल्याने गुंतवणूकदारांनी त्याला बेदम मारहाण केली. तपास अधिकारी धनंजय पाटील यांनी घाटीत उपचारासाठी दाखल केले. मुकुंदवाडी पोलिस ठाण्यात सुध्दा ज्ञानोबा अर्बन क्रेडिट सोसायटी पतसंस्थेच्या विरोधात फसवणूकीचा गुन्हा दाखल झालेला आहे. अगोदर दिलेली हि माहिती रात्री उशिरा उपस्थित गुंतवणूकदारांनी दिलेली आहे. दोन्ही प्रकरणांत फसवणूक झाली असल्याचे दिसून येत आहे. पण डि-24 न्यूज घटनास्थळी जी माहिती मिळाली ती देण्याचा प्रयत्न करत आहे. गुंतवणूकदारांनी खासदार इम्तियाज जलील यांची उशिरा रात्री भेट घेऊन न्याय मिळवून देण्याची मागणी केली आहे.

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow