पोलिस अधिक्षक कार्यालयात एसिबीच्या छाप्याने खळबळ...

पोलिस अधिक्षक कार्यालयात एसिबीच्या छाप्याने खळबळ...
छत्रपती संभाजिनगर (औरंगाबाद), दि.23(डि-24 न्यूज)
पोलिस अधिक्षक कार्यालय छत्रपती संभाजिनगर कार्यालयात लाच लूचपत प्रतिबंधक विभागाचा छापा पडल्याने पोलिस दलात खळबळ उडाली आहे.
सुभाष रामदास नवलू वय 47 वर्ष व्यवसाय- नौकरी, कनिष्ठ लिपिक, पोलीस अधीक्षक कार्यालय,(ग्रामीण ),
कमलेश गोकुळ इंदूरकर वय 47 वर्ष व्यवसाय खाजगी नौकरी रा. गवळीपूरा, छावणी यांच्यावर कार्यवाही करण्यात आली आहे.
काय आहे प्रकरण.... तक्रारदार यांनी परांडा ता. अंबड जि. जालना येथे प्लॉट खरेदी केलेला असून सदर प्लॉटवर बांधकाम करण्यासाठी घर बांधणी अग्रीम (DG लोन ) मिळणे करीता दिनांक 07/04/2025 रोजी कायदेशीर अर्ज केलेला आहे. त्यानंतर तक्रारदार काही दिवसांनी घर बांधणी अग्रीम फाईलची माहिती विचारण्यासाठी आलोसे यांच्याकडे गेला असता आलोसे यांनी घर बांधणी (DG लोन ) चे काम माझ्याकडे असून तक्रारदार यांच्या प्रस्ताव लवकरात लवकर पाठविण्यासाठी व घर बांधणी अग्रीम (DG लोन ) मंजूर करून देण्यासाठी आणि मदत करण्यासाठी तक्रारदार यांना 3,000/- रुपये द्यावे लागतील असे सांगितले होते.
दिनांक 05/05/2025 रोजी आलोसे यांनी परत तक्रारदार यांना फोन करून ऑफिसला बोलावून तुझे घर बांधणी अग्रीम (DG ) लोनचे काम फास्ट करून देतो, त्यासाठी मला 3,000/- रुपये द्यावे लागतील असे सांगून तक्रारदार यांचेकडून लाच घेण्याची इच्छा दाखवली.
तक्रारीची पडताळणी व लाच स्वीकृती :- दिनांक 05/05/2025 रोजी तक्रारदार यांनी दिलेल्या तक्रारीची तक्रारदार व पंच यांना आलोसे श्री नवलू यांच्याकडे पाठवून पडताळणी केली असता आलोसे श्री नवलू यांनी तक्रारदार यांच्याकडे लाच रकमेची मागणी करून फोन पे वर पाठवण्याचे सांगितले. तक्रारदार यांच्या फोन पे वर पैसे कमी असल्याने आलोसे यांनी आता तू पगार झाल्यानंतरच ये असे सांगितले होते.
दिनांक 20/06/2025 रोजी तक्रारदार यांना आलोसे श्री नवलू यांचा फोन आला व आलोसे श्री नवलू यांनी तक्रारदार यांना घर बांधणी अग्रीम (DG लोन ) संदर्भाने पोलीस अधीक्षक कार्यालय येथे बोलावले होते. आलोसे श्री. नवलू यांनी तक्रारदार यास घर बांधणी अग्रीम (DG लोन) बाबत तुला बेसिक किती आहे..? तसेच तुझे DG लोन चे फॉर्म ऑनलाईन झाले की आपले जे बजेट येईल त्या बजेट मध्ये तुझं काम करून देतो अशी चर्चा करून आलोसे यांनी तक्रारदार यास खाजगी ईसमाचा फोन पे नंबर देऊन त्या फोन पे नंबर वर 3,000/- रुपये टाकण्याचे सांगितले.
दिनांक 23/06/2025 रोजी तक्रारदार यांनी आलोसे श्री नवलू यांच्या सांगण्याप्रमाणे खाजगी ईसम कमलेश इंदूरकर यांच्या फोन पे वर 3,000/- रुपये टाकून फोन पे वर 3,000/- रुपये आल्याची खात्री झाल्यानंतर आलोसे श्री सुभाष नवलू आणि खाजगी ईसम कमलेश इंदूरकर यांना ताब्यात घेतले आहे. खाजगी ईसम श्री.कमलेश इंदूरकर हे आलोसे श्री. सुभाष नवलू यांचे सक्खे दाजी आहेत.
पोलीस अधीक्षक कार्यालय,
आलोसे क्रं 01 यांच्या अंग झडतीत 1± कंपनीचा मोबाईल व 2100./- रुपये रोख रक्कम.
खाजगी ईसम कमलेश इंदूरकर यांच्या अंगझडतीत realmi कंपनीचा मोबाईल व 3,540/- रुपये रोख रक्कम, आधारकार्ड.
आरोपी यांचे मोबाईल ताब्यात घेण्यात आला असुन पुढील निरीक्षण करुन तपास करण्याची तजवीज ठेवण्यात आली आहे.
आरोपी यांची घरझडती प्रक्रिया सुरु आहे.
पोलिस ठाणे सिडको येथे आरोपी विरोधात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे.
What's Your Reaction?






