रेल्वेत मारहाण झालेल्या घटनेतील ते वृद्ध सुखरुप, व्हिडिओ बनवणा-या त्या युवकांना अटक, अफवा पसरवणारे व्हिडिओ व्हायरल करु नका...!

रेल्वेतील घटनेतील मारहाण झालेले ते वृद्ध सुखरुप, व्हिडिओ बनवणा-या त्या युवकांना अटक, अफवा पसरवणारे व्हिडिओ व्हायरल करु नका...
मुंबई लोहमार्ग पोलिसांनी केले आवाहन....
मुंबई, दि.31(डि-24 न्यूज) 28 ऑगस्ट रोजी प्रवासी अश्रफ सय्यद हुसेन, वय 72, राहणार जळगाव हे धुळे ते सीएसएमटी एक्स्प्रेसमध्ये गाडीने त्यांच्या मुलीकडे कल्याण येथे येत असणा-या प्रवासादरम्यान जागेवरून त्यांचा व त्यांच्यासोबत प्रवास करत असलेल्या युवकांनी त्या वृद्ध इसमाला मारहाण करत असल्याचा व्हिडिओ समाज माध्यमांवर व्हायरल झाला होता.
या घटनेच्या अनुषंगाने ठाणे रेल्वे पोलिस सहायक पोलिस निरीक्षक गोपाळ यांनी तक्रारदार यांचे मुलीचे घरी जाऊन तक्रारदार यांचा समक्ष जबाब घेतला आहे. तक्रारदार यांचे तक्रारी प्रमाणे ठाणे रेल्वे पोलिस ठाणे येथे वरील नमूद प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
घटनेतील संशयित आरोपिंना धुळे येथे ताब्यात घेतले आहे. त्यांना ठाणे येथे आणण्याकरिता पथक रवाना करण्यात आले आहे. सिसिटीव्हि फुटेज व व्हायरल व्हिडिओ तपासून त्यांच्यावर कायदेशीर कारवाई केली जात आहे. घटनेतील प्रवासी अश्रफ सय्यद हुसेन, वय 72, हे सुखरुप आहेत. समाज माध्यमांवर पसरवण्यात येणाऱ्या अफवांवर कोणीही विश्वास ठेऊ नये तसेच खातरजमा न करता व्हिडिओ पुढे व्हायरल न करण्याचे आवाहन मुंबई लोहमार्ग पोलिसांनी केले आहे.
What's Your Reaction?






