घाटनांद्रा येथील तरुणाचा अपहरण करुन खंडणीसाठी केला खून, गावात हळहळ

 0
घाटनांद्रा येथील तरुणाचा अपहरण करुन खंडणीसाठी केला खून, गावात हळहळ

घाटनांद्रा येथील तरुणाचे अपहरण करून खंडणी न दिल्याने केला खुन... पोलिसांनी केले आरोपीस जेरबंद

सिल्लोड,दि.26(डि-24 न्यूज) तालुक्यातील घाटनांद्रा येथील सेवानिवृत्त सैनिक नामदेव भुरकाजी मोरे यांचा मुलगा कैलास नामदेव मोरे वय वर्ष 35 हा तरूण शनिवार दिनांक 21 सप्टेंबर रोजी सकाळी दहा वाजेच्या दरम्यान घरातुन अचानक बेपत्ता झाला. नामदेव मोरे व त्यांच्या नातेवाईकांनी कैलासचा सर्वत्र शोध घेतला परंतु तो सापडला नाही. अखेर कैलास याचे वडील नामदेव मोरे यांनी सिल्लोड ग्रामीण पोलीस स्टेशनला कैलास बेपत्ता असल्याची माहिती दिल्यावर उपविभागीय पोलिस अधिकारी कोल्हे व पोलीस निरीक्षक विजयसिंह राजपुत यांच्या मार्गदर्शनाखाली शोध सुरू केला. अखेर मयत कैलास या तरुणाचे येथील संजय मोरे याने अपहरण करून खंडणी न दिल्याने कैलासचा खुन करुन मृतदेह शेतात पुरुन टाकल्याचे तपासात निष्पन्न झाले. सदरील आरोपीस पोलिसांनी जेरबंद केले आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार घाटनांद्रा येथील सेवानिवृत्त नामदेव भुरकाजी मोरे यांचा मुलगा कैलास नामदेव मोरे वय वर्ष 35 हा तरूण शनिवार दिनांक 21 सप्टेंबर रोजी सकाळी 10 वाजेच्या दरम्यान घरातुन अचानक बेपत्ता झाला. घाटनांद्रा शिवारातील संपूर्ण परिसर पिंजून काढला परंतु तो सापडला नाही. अखेर पोलीसांनी स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेची मदत घेतली असता मयत कैलास मोरे याच्या मोबाईलवरून आलेल्या शेवटच्या काॅलच्या आधारे तपास करण्यात आला. त्यांना घाटनांद्रा येथीलच संजय राजेंद्र मोरे याचे नाव समोर आले. संजय विषयी पोलिसांनी गोपनिय माहिती घेतली असता त्याला शेअर मार्केट ट्रेडिंग खेळण्याचा छंद होता त्याच्यावर क्रेडिटचे कर्ज झाले होते व इतरही काही लोकांकडुन त्याने कर्ज घेतलेले असल्याने तो कर्जबाजारी झालेला होता ,त्याच्यावर झालेले कर्ज फेडण्यासाठी त्याने शनिवार दिनांक 21 सप्टेंबर रोजी सकाळच्या वेळी संशयीत संजय राजेंद्र मोरे याने बेपत्ता इसम कैलास नामदेव मोरे यास तो करीत असलेल्या शेतामध्ये घेऊन आला व त्याला पैशाची मागणी केली परंतु मयत कैलास याने पैसे देण्यास नकार दिल्याने त्या ठिकाणी दोघांचा वाद झाला व संजय मोरे याने कैलास मोरे याला यांच्या हातात व गळा आवळून जिवंत मारले.

   व त्याचे

प्रेत भर दिवसा मकाच्या शेतात लपवून ठेवले व रात्री पुन्हा शेतात जाऊन बांधावर खड्डा खोदून प्रेत त्या खड्ड्यात पुरून टाकले व पुन्हा कैलासच्या घरी जाऊन काही घडलेच नाही अशा पद्धतीने येत जात होता परंतु त्याने कर्ज फेडण्यासाठी मयत झालेल्या कैलासच्या मोबाईलवरून कैलासचा भाचा असलेला जीवन ज्ञानेश्वर निकम राहणार सावरगाव यांच्या मोबाईलवर व्हाट्सअप संदेश पाठवला की मुझे बेपत्ता असलेला कैलास हा माझ्या ताब्यात असून तुम मुझे 30 लाख रुपये दो नही तो उसकी लाश भी नही मिलेगी असा संदेश वारंवार व्हाट्सअप वर टाकून खंडणीची मागणी करीत होता असे तपासात निष्पन्न झाल्यावर रात्री संशयित संजय राजेंद्र मोरे यास ताब्यात घेऊन घटनास्थळावर जाऊन प्रेत खड्ड्यातून बाहेर काढून त्याचा पंचनामा केला व प्रेत कुजलेले असल्याने वैद्यकीय अधिकारी यांनी जागेवरच पंचनामा करुन प्रेत नातेवाईकांच्या ताब्यात दिले. हा मयत कैलास आरोपी संजय राजेंद्र मोरे यांचा चुलत साडु असुन कैलास मोरे यांच्या पश्चात आई-वडील, पत्नी, दोन मुले, एक मुलगी असा परिवार आहे. सदर घटनेचा तपास उपविभागीय पोलिस अधिकारी दिनेश कोल्हे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक विजय सिंह राजपूत स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक सतीश वाघ, सहायक पोलिस निरीक्षक पवन इंगळे, लहुजी घोडे, सचिन सोनार, राजेंद्र काकडे, अनंत जोशी, रंगराव बावस्कर, ज्ञानदेव ढाकणे व इतर कर्मचाऱ्यांनी घटनेचा तपास केला. उपविभागीय पोलीस अधिकारी दिनेश घुले हे स्वतः तीन दिवस गावात तळ ठोकून असल्याने गावाला छावणीचे स्वरूप प्राप्त झाले होते.

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow