पोलिस निरीक्षकाने मागितली एक कोटीची लाच, तिघांवर गुन्हा दाखल
पोलिस निरीक्षकाने मागितली एक कोटीची लाच, तिघांवर गुन्हा दाखल
बीड,दि.16(डि-24 न्यूज)
पोलिस अधीक्षक कार्यालयातील पोलिस निरीक्षक, गुन्हे शाखेचे यांनी एका प्रकरणात एक कोटी लाचेची मागणी केली तडजोड अंती 30 लाखातून पाच लाख रुपये लाच स्वीकारताना रंगेहाथ पकडले. यामध्ये सहायक फौजदार व एका खाजगी इसमालाही अटक करण्यात आली आहे.
हरिभाऊ खाडे, वय 52, पोलिस निरीक्षक, आर्थिक गुन्हे शाखा, पोलिस अधीक्षक कार्यालय, बीड, राहणार चानक्यपूरी, रविभुषण जाधवर, सहायक फौजदार, आर्थिक गुन्हे शाखा, कुशल प्रविण जैन, वय 29, राहणार मंत्री काॅलनी, बीड, खाजगी इसम या तिघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मौजकर टेक्सटाइल सुभाष रोड येथे पाच लाखाची लाच स्वीकारताना रंगेहाथ पकडले.
यातील तक्रारदार आणि त्याचा खासगी चालक यांनी मासाहे जिजाऊ मल्टी स्टेट बँकेचे संस्थापक संचालक बबन शिंदे यांचे शाळेच्या इमारतीच्या बांधकामाकरीता मटेरियल पुरवले होते. मोबदला म्हणून 60 लाख रुपये बबन शिंदे यांनी तक्रारदार व साक्षीदार यांना दिले होते. तथापि पोलिस स्टेशन शिवाजीनगर, बीड येथे बबन शिंदे व इतरांवर बँक अपहार प्रकरणी गुन्हा 360/23 दाखल असून तपास पोलीस निरीक्षक खाडे करत होते. यातील तक्रारदार व साक्षीदार यांना बबन शिंदे याने दिलेली 60 लाख रक्कम बँक अपहारातील आहे असे भासवून नमुद गुन्ह्यांत तक्रारदार व साक्षीदार यांना आरोपी करण्याचा धाक दाखवून तसेच तक्रारदार व साक्षीदार यांची मालमत्ता जप्त करण्याची भिती दाखवून यातील लोकसेवक जाधवर यांनी तक्रारदार यांचेकडे स्वतःसाठी एक लाख रुपये मागणी करुन पोनी खाडे यांनी तक्रारदार व साक्षीदार यांना प्रत्येकी 50 लाख याप्रमाणे 1 कोटी रुपये लाचेची मागणी करुन तडजोड अंती 30 लाख रुपये स्विकारण्याचे मान्य केले तसेच तक्रारदार यांचेकडून पहिला हप्ता म्हणून 5 लाख रुपये खाजगी इसम कुशाल जैन मौजकर टेक्सटाइल यांच्या कडे देण्यास सांगितले.
खाजगी इसम कुशाल जैन याने पोलिस निरीक्षक हरिभाऊ खाडे यांचे सांगण्यावरून पंच समक्ष 5 लाच स्वीकारताना रंगेहाथ पकडले. खाडे आणि जाधवर अजून फरार आहे. खाजगी इसम कुशल जैन यास अटक करण्यात आली आहे.
सदरील कार्यवाही लाच लूचपत विभागाचे पोलिस अधीक्षक संदीप आटोळे, अपर पोलीस अधीक्षक मुकुंद आघाव यांच्या मार्गदर्शनाखाली सापळा अधिकारी पोलिस उप अधीक्षक शंकर शिंदे, सह सापळा अधिकारी पोलिस निरीक्षक युनुस शेख, पोनी संतोष घोडके, अनिता ईटुबुने, सापळा पथक अविनाश गवळी, भरत गारदे, अमोल खरसाडे, अंबादास पुरी, हनुमान गोरे, सुरेश सांगळे, स्नेहल कुमार कोरडे, गणेश मेहेत्रे निकाळजे व नेहरकर मला यांनी केले.
What's Your Reaction?