दहा लाखांची लाच घेताना मनपा आयुक्त अडकले...!
दहा लाखांची लाच घेताना मनपा आयुक्त अडकले...!
जालना, दि.16(डि-24 न्यूज)-
जालन्याचे महापालिकेचे प्रभारी आयुक्त संतोष खांडेकर हे दहा लाखांची लाच घेताना रंगेहाथ पकडले गेल्याने प्रशासकीय यंत्रणेत खळबळ उडाली आहे. मोठे अधिकारी अशी लाच घेऊन कामे करत असतील तर सामान्य नागरिकांचे काय असा प्रश्न या छाप्यानंतर उपस्थित होत आहे.
एका खाजगी ठेकेदाराकडून हि लाच स्वीकारताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने हि कार्यवाई केली आहे. मनपाचे प्रभारी आयुक्त संतोष खांडेकर यांच्या मालमत्तेची चौकशी करण्याची मागणी वकील रिमा खरात यांनी केली आहे. आयुक्तांनी गोरगरीबांची घरे पाडली याचा हा परिणाम आहे. हि कार्यवाही योग्य असल्याचे वंचितचे युवा जिल्हाध्यक्ष विजय लहाने यांनी प्रतिक्रिया दिली आहे. ठेकेदाराचे बील काढण्यासाठी हि लाच मागितली होती. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार दाखल करण्यात आली यानंतर हि मोठी कार्यवाई करण्यात आली. कारवाईनंतर आयुक्तांच्या शासकीय बंगल्याची झाडाझडती सुरू होती.
What's Your Reaction?