प्लाॅटचे फेर करण्यासाठी तलाठ्याने मागितली लाच, लाचलुचपत पथकाने रंगेहाथ पकडले...!

प्लाॅटचे फेर करण्यासाठी तलाठ्याने मागितली लाच, लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहाथ पकडले...
छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद), प्लाॅटचे फेर करण्यासाठी तलाठ्याने लाच मागितल्याने एका महीलेच्या तक्रारीवरून तलाठयासह एका खाजगी व्यक्तीला लाचलुचपत प्रतिबंधक सापळ्यात लाच घेताना रंगेहाथ पकडले आहे.
आरोपी खाजगी इसम -देविदास भाऊराव बकाल, वय 52 वर्ष, खाजगी इसम, रा. मयूर पार्क छत्रपती संभाजीनगर,
आलोसे श्री विनोद शेषराव मुळे , वय 49 वर्ष, पद तलाठी , वर्ग 3, कार्यालय गांधेली सजा छत्रपती संभाजीनगर, रा. पिसादेवी छत्रपती संभाजीनगर यांना लाच घेताना पकडले.
विस्ताराने अधिक माहिती अशी तक्रारदार यांचे पतीचे नावाने ता. जि. छत्रपती संभाजीनगर मध्ये मौजै गांधेली शिवार गट क्र.133 मध्ये प्लॉट क्रमांक 40,41 होते त्या प्लॉटचा तक्रारदार यांच्या नावाने फेर घेण्यासाठी तलाठी यांनी मागील महीन्यांपासुन प्रलंबित ठेवले होते ,दिनांक. 24/04/2025 रोजी तक्रारदार यांनी समक्ष लाप्रवि कार्यालय छ.संभाजीनगर येथे तक्रार दिली की, सदर प्लॉटचा फेर घेण्यासाठी आलोसे व खाजगी इसम हे लाचेची मागणी करत होते.
लाचमागणी पडताळणी- तक्रारदार यांच्या तक्रारीनंतर दिनांक 24/04/2025 व दिनांक 05/05/2025 रोजी शासकिय पंचासह तक्रारदाराकडुन आलोसे यांची गांधेली सजा कार्यालय छ.संभाजी नगर या ठिकाणी लाचमागणी पडताळणी केली असता आरोपी क्रमांक 1 खाजगी इसम यांने फेर घेण्यासाठी स्वत:सह आलोसे क्रमांक 2 यांच्या करीता पंचा समक्ष तक्रारदाराकडुन 5,000/- रुपये लाचेची मागणी करुन तडजोडी अंती 5,000/- रुपये स्विकारण्याचे मान्य केले होते. तसेच आलोसे क्रमांक 2 यांनी लाचेस प्रोत्साहन दिल्याचे निष्पन्न झाले.
सापळा कारवाई- यातील आरोपी खाजगी ईसम याने आज दिनांक 05/05/2025 रोजी गांधेली सजा या ठिकाणी शासकिय पंच यांचेसह तक्रारदाराकडुन लाचस्विकृती कारवाईचे आयोजन केले असता खाजगी इसम यांनी तक्रारदार यांच्याकडून लाचेची रक्कम स्वतः पंच साक्षीदारा समक्ष स्विकारलेली आहे.
खाजगी ईसम याची अंगझडती-
1) लाच रक्कम 5000/-रु.
2) लाच रकमे व्यतिरिक्त 18,400/- रु रोख रक्कम
3) 15,000/- रू कि. सॅमसंग कंपनीचा मोबाईल.
आरोपीताची घरझडती - आरोपीताची घरझडती सुरू आहे.
आरोपी यांचे मोबाईल ताब्यात घेण्यात आले असुन पुढील निरीक्षण करुन तपास करण्याची तजवीज ठेवण्यात आली आहे.
इतर माहिती- आलोसे क्रमांक 2 यांचे विरोधात कलम 12 तर आरोपी खाजगी इसम क्रमांक 1 यांचे विरोधात कलम 7(अ) भ्र.प्र.अधिनियम 1988 प्रमाणे पोस्टे चिकलठाणा, छत्रपती संभाजीनगर ग्रामीण या ठिकाणी गुन्हा नोंद करण्यांची प्रक्रिया सुरु आहे. नमुद आलोसे क्रमांक 2 यांना अटक करून तपास करण्याची तजवीज ठेवण्यात आली आहे.
सापळा अधिकारी- शांतीलाल चव्हाण, पोलीस निरीक्षक, ला. प्र. वि छत्रपती संभाजीनगर मो नं 8888390777.
मार्गदर्शक- श्री. संदीप आटोळे, पोलीस अधीक्षक, ला.प्र.वि.छत्रपती संभाजीनगर. 9923023361
श्री.मुकुंद अघाव , अपर पोलिस अधीक्षक ला.प्र.वि. छत्रपती संभाजीनगर मोनं.9881460103
श्री.सुरेश नाईकनवरे पो. उप अधिक्षक ला. प्र. वि. छत्रपती संभाजीनगर मो.न.9923247986
सापळा पथक - पोह रवींद्र काळे , अशोक नागरगोजे पोअं/ सी एन बागुल ला. प्र. वि.छत्रपती संभाजीनगर
जिल्ह्यातील सर्व नागरिकांना आवाहन करण्यात येते की त्यांचेकडे कोणत्याही शासकीय अधिकारी कर्मचारी यांनी किंवा त्यांचे वतीने खाजगी इसम कोणतेही शासकीय काम करून देण्यासाठी कायदेशीर फी व्यतिरिक्त अन्य लाचेची मागणी करीत असल्यास तात्काळ आमचेशी संपर्क साधावा.
भ्रष्टाचारा संबंधित काही तक्रार असल्यास
टोल फ्री क्र:- 1064
पोलीस उप अधीक्षक, लाप्रवि.छत्रपती संभाजीनगर :- 02402344050 वर संपर्क साधावा.
What's Your Reaction?






