जिन्सी परिसरातील सार्वजनिक टेरेसवरचे अनधिकृत बांधकाम निष्काशित...

 0
जिन्सी परिसरातील सार्वजनिक टेरेसवरचे अनधिकृत बांधकाम निष्काशित...

जिन्सी परिसरातील सार्वजनिक टेरेसवरचे अनधिकृत बांधकाम निष्काशीत...

छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद), दि.16(डि-24 न्यूज)-जिन्सी परिसरातील स्टार हाइट्स या अपार्टमेंट मधील 

टेरेसवर अनधिकृतरितीया बांधण्यात आलेले दोन खोल्या आणि बाथरूम आज महानगरपालिका अतिक्रमण विभागाने निष्कसित केले. 

जीन्सी येथील स्टार हाईट नावाची एका बिल्डरने बिल्डिंग डेव्हलप केलेली आहे. यामध्ये वेगवेगळे सदनिका धारक आहे. एका सदनिका धारकने टेरेसवर जाऊन दोन रूम अंदाजे दहा बाय दहा व बाथरूम याचे बांधकाम करून वापर सुरू केला होता.

याबाबत याच अपार्टमेंट मध्ये फ्लॅट रहिवाशी ज्येष्ठ महिला नागरिक नाहीद सुलताना यांनी तक्रार दिली होती की सदर टेरेसचा वापर इतर सदनिका धारकांना करू देत नाही. टेरेसचा वापर तो स्वतः करतो वापर करण्यासाठी गेले असता शिवीगाळ करत धामकावतो. याबाबत प्रशासक जी श्रीकांत यांच्या आदेशानुसार एका वर्षांपूर्वी कारवाई करण्यासाठी पथक गेले असता, सदर व्यक्तीने माझ्या घरी मुलीचे लग्न आहे असे सांगून दहा दिवसाच्या अवधी मागितला आणि अवधी संपल्यानंतर त्याने चक्क हे प्रकरण माननीय न्यायालयात दाखल केले. सदर बांधकामाला स्थगिती मिळावी म्हणून या प्रकरणात माननीय न्यायालयात मनपा पॅनलचे एड राजेंद्र मुगदिया यांनी महापालिकेची बाजू मांडली तसेच नगररचना विभागाने सुद्धा सदर बांधकाम हे अनधिकृत आहे असे पत्र अतिक्रमण विभागाला दिले होते. न्यायालयात मनपाची बाजू योग्य प्रकारे मांडल्याने संमतीदार पुस्तके ती मिळाली नाही आणि त्याच्या दावा फेटाळण्यात आला. याबाबत संबंधित महिलेने पुन्हा आयुक्त महोदय यांना 30 जुलै रोजी निवेदन देऊन विनंती केली की न्यायालयाचे आदेश आहे प्रशासनाने कारवाई करावी.

 प्रशासक जी श्रीकांत यांनी त्यांच्या अर्जावर त्वरित कारवाई करावी असे पृष्ठांकित करून संबंधित अधिकाऱ्यांना आदेश दिले. सदर आदेशाचे पालन करून नियंत्रण अधिकारी अतिक्रमण विभाग संतोष वाहूळे यांचे मार्गदर्शन घेऊन संबंधित व्यक्तीला दोन वेळेस सूचना दिली की सदरील अतिक्रमण त्यानी स्वतःहून काढून घ्यावे. परंतु सदर व्यक्तीने तसे न करता टाळाटाळ केली.  

 आज रोजी सकाळी बारा ते एकच्या दरम्यान कारवाई करण्यात आली. सदर कारवाईत सहायक आयुक्त नईम अन्सारी, अतिक्रमण निरीक्षक सय्यद जमशीद, रवींद्र देसाई, सागर श्रेष्ठ सह नागरी मित्र पथकचे प्रमोद जाधव, सहाय्यक आयुक्त (अतिक्रमण) संजय सुरडकर यांनी सहभाग घेतला.

 सदर कारवाई वरच्या मजल्यावर असल्याने घन हातोड्याच्या साह्याने मजुराने ते रूम निष्कसित केले.

 सर्वप्रथम कारवाईच्या सुरुवातीस त्याला सामान काढण्यात सर्व कर्मचाऱ्यांनी मदत केली आणि त्याचे सामान बाजूला काढून दिले.

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow