भावसिंगपूरा भागात मुख्य जलवाहिनीवरील 159 अनाधिकृत नळ खंडित...!
भावसिंगपुरा भागात मुख्य जलवाहिनी वरील १५९ अनाधिकृत नळ खंडित...
औरंगाबाद, दि.12(डि-24 न्यूज) महानगरपालिकेच्या वतीने भावसींगपुरा भागात महानगरपालिकेच्या २५० मिमी जलवाहिनी वरील १५९ अनाधिकृत नळ जोडण्या खंडित करण्यात आल्या.
प्रशासक तथा आयुक्त मनपा जी. श्रीकांत यांच्या आदेशानुसार अनाधिकृत नळ जोडण्या खंडित करण्याची मोहीम राबविण्यात येत आहे.
या अनुषंगाने विशेष अनधिकृत नळ जोडणी शोध पथक चे प्रमुख अतिरिक्त आयुक्त 2 तथा मुख्य लेखा व वित्त अधिकारी संतोष वाहुळे यांच्या मार्गदर्शनाखाली भावसींगपुरा या भागात महानगरपालिकेची जुन्या २५० मिमी मुख्य जलवाहिनी वरील एकूण १५९ अनधिकृत नळ खंडित करण्यात आले.
आचारसंहिता नंतर प्रथमच पोलिस बंदोबस्त आणि दंगा नियंत्रण पथक सोबत घेऊन कार्यवाही पूर्ण करण्यात आली.
मुख्य जलवाहिनी वरील अनधिकृत नळ जोडणी खंडित करण्याची मोहीम चालू राहील.
असे पथक अभियंता रोहित इंगळे यांनी सांगितले.
सदरील कारवाई उप अभियंता मिलिंद भामरे,
पथक अभियंता रोहीत इंगळे, कनिष्ठ अभियंता सचिन वेलदोडे, हेमंत हिवराळे, सुमैर शेख, अक्षय साळवी आणि
पोलिस निरीक्षक राजेंद्र होळकर, पो.उप निरीक्षक सुरेश माळी, पो.उप निरीक्षक विनोद भालेराव, पो. उप निरीक्षक गोविंद एखिलवाले दंगा नियंत्रण पथक तैनात होते.
तसेच पथक कर्मचारी मो. शरीफ, वैभव भटकर, स्वप्निल पाईकडे, तमिज पठाण, सागर डिघोळे, तुषार पोटपिल्लेवार आदींनी पूर्ण केली.
What's Your Reaction?