बेगमपू-यातील धोकादायक इमारत महापालिकेच्या वतीने जमीनदोस्त...!
बेगमपुऱ्यातील धोकादायक इमारत पाडली...
औरंगाबाद, दि.11(डि-24 न्यूज ) महानगरपालिकेच्या वतीने मनपा तर्फे धोकादायक इमारतीवर कारवाई सुरू करण्यात आली आहे.
आज रोजी आयुक्त तथा प्रशासक जी श्रीकांत यांच्या यांचे आदेशाने अतिरिक्त आयुक्त संतोष वाहुळे यांचे निर्देशानुसार बेगमपुरा येथील चंद्रकांत रौतले यांची २०x४० आकारातील जुनी दोन मजली इमारत निष्कासित करण्यात आली. सदर मिळकत ही मुख्य बाजारपेठ येथे वर्दळीच्या ठिकाणी असल्याने कोणतेही क्षणी इमारत कोसळण्याची दाट शक्यता निर्माण झाली होती. सदरील मिळकतीस मनपाद्वारे धोकादायक इमारतीची नोटीस महाराष्ट्र महानगर अधिनियम १९४९ चे कलम २६४ , २६५ व २४६ अन्वव्ये धोकादायक इमारतीची नोटीस बजावण्यात आली होती. सबंधित इमारत धारकांनी आपले संसार उपयोगी सामान काढणे साठी प्रशासनाकडून अवधी मागितला होता.
आज सदर ठिकाणी जुनी दोन मजली मोडकळीस आलेली धोकादायक इमारत जेसीबी च्या साह्याने निष्कासित करण्यात आली.
या अगोदर दि.०७ जून रोजी गुलमंडी येथील जीर्ण झालेली धोकादायक इमारत पाडण्यात आली होती.
सदर कारवाई अतिरिक्त आयुक्त -२ संतोष वाहुळे यांच्या आदेशाने मा. उपायुक्त सविता सोनवणे यांचे मार्गदर्शनाखाली पद निर्देशित अधिकारी संजय सुरडकर, इमारत निरीक्षक रामेश्वर सुरासे यांनी पार पाडली.
अशी माहिती अतिक्रमण विभागाच्या वतीने देण्यात आली
आहे.
What's Your Reaction?