डाॅ.कराड यांनी घेतला औक्ट्रम घाट, गॅस पाइपलाइनचा आढावा

डॉ.कराड यांनी घेतला औट्रम घाट भुयारी मार्ग,
गॅस पाईपलाईनसह विविध विषयांचा आढावा
छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद), दि.2(डि-24 न्यूज)- औट्रम घाटातील वाहतुक सुलभ करण्यासाठी करावयाचा भुयारी मार्ग, शहरात घरगुती गॅस साठी करावयाची पाईप लाईन व गॅस वितरण, छावणी परिसरात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे स्मारक अशा विविध विषयांचा आढावा आज खासदार डॉ. भागवत कराड यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आला.
जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या या बैठकीस अपर जिल्हाधिकारी संभाजीराव अडकुणे, निवासी उपजिल्हाधिकारी संगिता राठोड, उपवनसंरक्षक सुवर्णा माने, राष्ट्रीय महामार्ग विभागाचे प्रकल्प संचालक रविंद्र इंगोले. व्यवस्थापक संघर्ष, जी. राममोहन, भारत पेट्रोलियमचे अक्षय वढवा, मनोज जाधव, तसेच विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते. तर अहिल्यानगरचे जिल्हाधिकारी डॉ. पंकज आशिया हे दुरदृष्यप्रणालीद्वारे सहभागी झाले होते.
छत्रपती संभाजीनगर शहरात तसेच औद्योगिक वसाहतीतील उद्योगांना लागणारा गॅस हा पाईपलाईन द्वारे करता यावा यासाठी प्रकल्प सुरु आहे. त्याचा आढावा घेण्यात आला. शहरातील १० झोन पैकी पहिल्या टप्प्यात ४ झोन मध्ये येत्या सप्टेंबर महिन्यात किमान १० हजार घरांना पाईपलाईनद्वारे गॅस पुरवठा करण्याचे नियोजनाबाबत आढावा घेण्यात आला.
तसेच औट्रम घाटात राष्ट्रीय महामार्गासाठी भुयारी मार्ग करण्याच्या कामाचाही आढावा घेण्यात आला. रेल्वेलाईन साठी व महामार्गासाठी भुयारी मार्ग करण्याबाबत आढावा घेण्यात आला. यासाठी रेल्वे विभाग व राष्ट्रीय महामार्ग विभाग यांनी स्वतंत्रपणे प्रकल्प अहवाल तयार करावा,अशी सुचना देण्यात आली.
शहरातील छावणी परिसरात डॉ.बाबासाहेब आंबेडकरांचे वास्तव्य असलेल्या बंगला क्रमांक ९ येथे स्मारक करण्याबाबत कॅन्टोनमेंट कडून परवानगी मिळाली असल्याचे यावेळी सांगण्यात आले. त्याच सोबत वेरूळ येथे मालोजीराजे गढी, शहाजीराजे स्मारक तसेच घृष्णेश्वर मंदिर परिसरातील अहिल्यादेवी कुंड याबाबतही आढावा घेण्यात आला.
What's Your Reaction?






