एसडिपिआयने इंजिनिअरला दिली जिल्हाध्यक्ष पदाची जवाबदारी....

 0
एसडिपिआयने इंजिनिअरला दिली जिल्हाध्यक्ष पदाची जवाबदारी....

एसडिपिआयने इंजिनिअरला दिली जिल्हाध्यक्ष पदाची जवाबदारी....

छत्रपती संभाजिनगर (औरंगाबाद), दि.2(डि-24 न्यूज) शहर आणि जिल्ह्यात नागरी समस्येला वाचा फोडणारा राजकीय पक्ष सोशल डेमोक्रेटिक पार्टी ऑफ इंडिया(एसडिपिआय) ने हळुहळू पक्ष संघटना मजबुत करायला सुरुवात केली आहे. 1 जून रोजी झालेल्या पक्षाच्या बैठकीत उच्चशिक्षित इंजिनिअर समीर शाह यांना जिल्हाध्यक्ष पदाची जवाबदारी दिल्याने कार्यकर्त्यांमध्ये उत्साह वाढला आहे. यासोबत जिल्हा उपाध्य पदाची जवाबदारी सक्रीय असलेले बिडकीनचे डाॅ. हाफिज इम्रान यांना देण्यात आली आहे. 13 सदस्यांची कार्यकारीणी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीच्या तयारीसाठी घोषित केली आहे. 

प्रदेश सह प्रभारी मुजाहीद हुबली, प्रदेश महासचिव सय्यद कलिम, प्रदेश समिती सदस्य हाफिज मोहतसिम, वरिष्ठ नेता मुजंमिल खान यांच्या उपस्थितीत हा निर्णय घेण्यात आला.

जिल्हा कार्यकारीणी अशी आहे....

जिल्हाध्यक्ष इंजि.समीर शाह, उपाध्यक्ष डाॅ.हाफीज इम्रान, जिल्हा महासचिव शेख नदीम, जिल्हा महासचिव अब्दुल अलिम, जिल्हा महासचिव मोहसिन खान, जिल्हा सचिव साकी अहमद, कोषाध्यक्ष काजी समीउल्लाह, जिल्हा सदस्य जबीन शेख, अशरफ पठाण, उमर मिर्झा, आरीफ शाह, साजिद पटेल, शेख मुश्ताक .

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow