मराठा संघटनांच्या विरोधामुळे अजित पवारांचा दौरा रद्द... हेलिकॉप्टर बिघाडाचे कारण...!

 0
मराठा संघटनांच्या विरोधामुळे अजित पवारांचा दौरा रद्द... हेलिकॉप्टर बिघाडाचे कारण...!

मराठा संघटनांच्या विरोधामुळे अजित पवारांचा दौरा रद्द... हेलिकॉप्टर बिघाडाचे कारण...!

औरंगाबाद, दि.2(डि-24 न्यूज) जिल्ह्यातील गंगापूर येथे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा आज दौरा होता तो दौरा मराठा संघटनांच्या विरोधामुळे रद्द करावा लागला आहे तर हेलिकॉप्टरच्या बिघाडामुळे हा नियोजित दौरा रद्द झाल्याचे बोलले जात आहे.

सध्या मराठा आरक्षणाचे आंदोलन सुरू असल्याने सत्ताधारी परिस्थिती बघून दौरे करत असल्याचे यावरून दिसत आहे.

गंगापूर येथील श्रीमुक्तानंद महाविद्यालय परिसरात 2 व 3 डिसेंबर रोजी 43 वे मराठवाडा साहित्य संमेलनाचे उद्घाटनासाठी उपमुख्यमंत्री अजित पवार येणार होते. यावेळी ते जिल्ह्याचा आढावा घेत पत्रकार परिषद पण घेणार होते. राज्यात सुरु असलेल्या मराठा समाजाच्या आंदोलनाचा फटका पवार यांना पुन्हा बसला अशी चर्चा आहे. हेलिकॉप्टर बिघाडाचे कारण दिले जात आहे. अजित पवार यांना प्रशासनाने रोखावे त्यांच्यामुळे कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला तर त्याला प्रशासन जवाबदार राहिल असा इशारा मराठा संघटनांनी दिला होता.

आज सकाळी लासूर रोडवरील हेलिपॅडवर हेलिकॉप्टरने त्यांचे आगमन होणार होते. प्रशासनाने पूर्ण तयारी केली होती.

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow