काँग्रेसचे प्रभारी शहराध्यक्षांच्या विरोधात पटोलेंकडे तक्रारींचा पाढा... पटोले म्हणाले काम करा
काँग्रेसचे प्रभारी शहराध्यक्षांच्या विरोधात पटोलेंकडे तक्रारींचा पाढा... पटोले म्हणाले काम करा... पदाधिकारी यांना झापले...!
औरंगाबाद, दि.2(डि-24 न्यूज) अगोदरच शहरात काँग्रेस कमकुवत असताना गटबाजी व अंतर्गत वाद असल्याने पक्ष विस्तार होने कठीण झाले आहे. औरंगाबाद नामांतराच्या दुटप्पी भूमिका असल्याने अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते सोडून गेले. नामांतरावरच्या निर्णयानंतर मुस्लिम अल्पसंख्याक समाज पक्षापासून दूर गेला व गटबाजी वाढली. सोशल मीडियावर एक दुस-यांच्या विरोधात कमेंट केले जात आहे. अल्पसंख्याक मुस्लिम समाजाला पक्षांकडे यावे यासाठी प्रयत्न करण्याची गरज असल्याचे काही पदाधिकारी यांनी आपले मत बैठकीत व्यक्त केले. प्रभारी शहराध्यक्षांची धुरा शेख युसूफ यांच्या खांद्यावर आल्यानंतर नवीन कार्यकर्ते जुळायला तयार नाही. काल मुंबईत टिळक भवन येथे शहरातील विविध सेलचे पदाधिकारी यांची प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी बैठक घेतली. या बैठकीत पदाधिकारी यांनी प्रभारी शहराध्यक्ष युसुफ शेख यांच्या विरोधात तक्रारींचा पाढा वाचल्याने पक्ष विस्तार कसा होणार असा प्रश्न काँग्रेसचे निष्ठावंत कार्यकर्त्यांना पडला आहे. पक्षाचे काम करा नाही तर पद सोडून घरी बसा असे नाना पटोले यांनी पदाधिकाऱ्यांना सुनावले आहे अशी माहिती सुत्रांनी दिली.
अंतर्गत गटबाजी थेट प्रदेशाध्यक्ष यांच्याकडे पोहोचली आहे. यावेळी त्यांनी उपस्थित विविध सेल, विभागांच्या पदाधिकारी यांची चांगलीच कानउघाडणी केली असल्याची माहिती सुत्रांनी दिली आहे.
नवीन कार्यकारिणी नियुक्ती, विविध सेलच्या नियुक्ती, एक दुसरे विरोधात तक्रारी, नोटीसा यामध्ये वेळ जात आहे. लोकसभेच्या निवडणुका तोंडावर असताना शहर काँग्रेस अंतर्गत गटबाजीचे ग्रहण लागले आहे.
वरिष्ठ नेत्यांकडे नेहमी तक्रारी केल्या जात असल्याने पक्षाचा विस्तार कसा होणार आणि आगामी निवडणुकीत विविध पक्षांचे उमेदवारांशी कसा मुकाबला करणार. नेहमी तक्रारी येत असल्याने पटोले यांनी सर्व पदाधिकारी यांना मुंबईत बोलावून घेतले.
यामध्ये शहराध्यक्ष शेख युसूफ, माजी शहराध्यक्ष एड सय्यद अक्रम, महीला आघाडीच्या शहराध्यक्ष दिपाली मिसाळ, युवक काँग्रेसचे शहराध्यक्ष सागर नागरे, एनएसयुआयचे शहराध्यक्ष मोहित जाधव, अनुसूचित जाती विभागाचे प्रभारी जयप्रकाश नारनवरे, प्रवक्ते डॉ.पवन डोंगरे, अनिस पटेल, महिला काँग्रेसच्या उपाध्यक्ष नगमा सिद्दीकी, एनएसयुआयचे दिक्षा पवार, मोईन शेख हर्सलकर आदी पदाधिकारी उपस्थित होते.
शहराध्यक्ष शेख युसूफ यांनी सांगितले बुथ कमिट्या नाही, पदाधिकारी काम करत नाही, पक्ष बांधणीसाठी पदाधिकारी लक्ष देत नसल्याचे तक्रार केली. शहराध्यक्ष हे काम करु देत नाही, कामात खोडा घालतात अशा तक्रारी महीला पदाधिकारी यांनी केले. यानंतर पदाधिकारी यांना पटोले यांनी सुनावले. काम करायचे नसेल तर घरी बसा असे सुनावल्याची चर्चा काँग्रेसच्या गोटात सुरू झाली आहे. काँग्रेसच्या बूथ कमिट्या सुध्दा तयार नसल्याने प्रदेशाध्यक्ष यांनी नाराजी व्यक्त केली. एका वार्डात एक मंडळ समिती अध्यक्ष व 11 सदस्य तयार करा असे पक्षाचे आदेश असतानाही हे काम झाले नाही. अशी पोलखोल शेख युसूफ यांनी केली. आता तरी हे पदाधिकारी कामाला लागतील का...? तशीच गटबाजी व अंतर्गत वाद सुरू राहतील.
What's Your Reaction?