कायदेशीर प्रश्नांसाठी माथाडी कामगारांनी काढला मोर्चा

 0
कायदेशीर प्रश्नांसाठी माथाडी कामगारांनी काढला मोर्चा

कायदेशीर प्रश्नांसाठी माथाडी कामगारांचा जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा... 

 सुधारणेचा नावाखाली जर सरकार माथाडी कायद्याचा जीव घेणार असेल तर राज्यातील माथाडी रस्त्यावर उतरल्याशिवाय राहणार नाहीत.....

 शेतकऱ्यांचे शेतीमालाचे हमी भावास तात्काळ कायद्याच्या संरक्षण द्या......

औरंगाबाद,दि.1(डि-24 न्यूज) माथाडी कामगारांच्या विविध मागणीसाठी आज जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला.

माथाडी कामगार व शेतकऱ्या सह सर्व अंगमेहनती कष्टकऱ्यांना किमान 5 हजार रुपये पेन्शन सुरू करा......

सरकारने माथाडी कायद्याची काटेकोर अंमलबजावणी केली नाही तर , राज्यातील माथाडीची सर्व काम बंद पाडवी लागतील......

                      डॉ. बाबा आढाव..!!

मोर्चातील माथाडी कामगारांना , महाराष्ट्र राज्य हमाल मापाडी महामंडळाचे अध्यक्ष व कष्टकऱ्यांचे नेते डॉ. बाबा आढाव यांनी पुण्याहून ऑनलाईन संबोधित केले. सरकारच्या माथाडी कामगार विरोधी धोरणा विरुद्ध काढलेल्या मोर्चा बद्दल, सर्व मोर्चेकरांचे बाबांनी पुण्याहून अभिनंदन केले. राज्यातील तमाम माथाडी कामगार व कष्टकऱ्यांना आपली एकजूट भक्कम करुन लढा द्यावाच लागेल असे सांगितले पण सरकार जर माथाडी कायद्याची काटेकोर अंमलबजावणी करणार नसेल तर, राज्यातील माथाडीची सर्व काम बंद केली जातील असा इशारा या वेळी त्यांनी दिला.

जिल्ह्यातील माथाडी कामगारांनी क्रांती चौकात छत्रपती शिवाजी महाराजांना अभिवादन करुन मोर्चास सुरुवात केली व मोर्चा पैठणगेट, गुलमंडी, सिटी चौक, सराफा, शाहगंज, मार्गे जिल्हाधिकारी कार्यालयावर गेला.

मोर्चात जिल्ह्यातील विविध क्षेत्रात ( मोंढा, भाजी मार्केट, कारखाने, धान्य गोदाम.. इ इ...) काम करणाऱ्या माथाडी कामगारांचा मोर्चात सहभाग होता.

या मोर्चाचे नेतृत्व,महाराष्ट्र राज्य हमाल मापाडी महामंडळाचे सरचिटणीस साथी सुभाष लोमटे, मराठवाडा लेबर युनियनचे सरचिटणीस अड. सुभाष सावंगीकर, व अन्य संघटनांचे प्रमुखांनी केले.

डॉ. बाबा आढाव यांचे नेतृत्वाखाली महाराष्ट्र राज्य हमाल मापाडी महामंडळाचे एक शिष्टमंडळ मुख्यमंत्र्यांना पुढील 2-3 दिवसात भेटण्याचा प्रयत्न करणार असल्याचे यावेळी साथी सुभाष लोमटे यांनी सांगितले.

मोर्चाचे वतीने एक शिष्टमंडळ अप्पर जिल्हाधिकारी डॉ.अरविंद लोखंडे यांना भेटले, ज्यात महाराष्ट्र राज्य हमाल मापाडी महामंडळाचे सरचिटणीस साथी सुभाष लोमटे, मराठवाडा लेबर युनियनचे उपाध्यक्ष साथी छगन गवळी, औरंगाबाद बाजार समितीचे संचालक साथी देविदास कीर्तीशाही, ट्रान्सपोर्ट अँड डॉक वर्कर्स युनियन मुंबईचे साथी राजेंद्र जेधे, अखिल भारतीय छावा श्रमिक संघटना, महाराष्ट्र नवनिर्माण माथाडी कामगार सेनेचे प्रशांत आटोळे, महाराष्ट्र माथाडी कामगार संघटनेचे काकासाहेब काकडे, क्रांती माथाडी कामगार संघटनेचे शरद किर्तीकर, शाहू महाराज माथाडी युनियनचे मकसुद अन्सारी, महाराष्ट्र राज्य क्रांतिकारी जनरल कामगार युनियनचे दिलीप म्हस्के,कागद कांच पत्रा कामगार संघटनेच्या साथी आशाबाई डोके यांचा सहभाग होता.

 जिल्हयातील माथाडी कामगारांचे प्रश्न मार्गी लावण्यासाठी माथाडी मंडळ, पुरवठा विभाग व इतर जबाबदार अधिकाऱ्यांना बोलावून जिल्हाधिकारी यांचे उपस्थितीत दिस. 18 डिसेंबर पर्यंत बैठक घेतली जाईल असे आश्वासन अप्पर जिल्हाधिकारी यांनी यावेळी दिले.

कायद्याच्या चौकटीत प्रश्न जर मार्गी लावले गेले नाहीत, तर बेमुदत ठिय्या सत्याग्रहास प्रत्येकाने तयार रहावे असे आवाहन शेवटी साथी सुभाष लोमटे यांनी केले.

या मोर्च्यात मराठवाडा लेबर युनियन - महाराष्ट्र राज्य हमाल मापाडी महामंडळाचे साथी छगन गवळी, साथी प्रविण सरकटे, साथी अरविंद बोरकर, , साथी सर्जेराव जाधव, गणेश तरटे, प्रवीण मगरे, साथी अली खान, साथी नाजीम भाई, साथी शेख रफिक, साथी साईनाथ शिंदे, साथी आबासाहेब तुपे, भारत तुपे, अशोक वाघमारे, विभीषण गवळी, दिलीप राजगुरू, साथी फरीद पठाण , साथी शिवाजी राऊत, साथी भारत गायकवाड, साथी सदाशिव साळुंखे, विकास शेंदुरवाड, सुनील नागरे, इंद्रजित भालेराव, ज्ञानेश्वर होनमाने, गणेश पवार, पाठक (bkt ), उमेश चक्रे,गोदामातील साथी भगवान घणघाव, साथी जगन भोजने ( पाचोड), साथी सत्तार भाई ( बिडकिन), साथी भगवान वारांगे ( सोयगाव), साथी अहमद भाई ( अजिंठा), साथी शेख कलीम भाई ( सिल्लोड) , साथी ज्ञानेश्वर नवले ( पिशोर), साथी फारुख भाई ( कन्नड), साथी किरण पगारे ( वैजापूर), साथी संतोष म्हैसमाले ( गंगापूर), साथी नरवडे ( नरवडे).... इ चा प्रमुख सहभाग होता.

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow