सिध्दार्थ महाविद्यालयात जागतिक एडसदिन साजरा
सिद्धार्थ महाविद्यालय पडेगाव येथे जागतिक एडस दिवस साजरा.....
औरंगाबाद, दि.1(डि-24 न्यूज) सिद्धार्थ महाविद्यालय पडेगाव येथे जागतिक एडस दिनानिमित्त कार्यक्रम घेण्यात आला यावेळी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. मनोहर वानखडे, यांच्या हस्ते एडस दिनाचे कार्यक्रमाचे उद्घाटन करण्यात आले यावेळी महाविद्यालयाचे संचालक, साहिल मगरे यांची प्रमुख उपस्थिती होती.
यावेळी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. मनोहर वानखेडे म्हणाले आजही या आजाराबद्दल मोठ्या प्रमाणावर एड्सबाबत आपल्या समाजात अनेक गैरसमज आणि भीती आहे. त्यामुळे, या आजाराने ग्रस्त लोकांना समाजात आजही लाजिरवाणेपणाचा सामना करावा लागतो. या आजाराबाबत लोकांना जागरूक करण्यासाठी दरवर्षी 1 डिसेंबर रोजी ‘जागतिक एड्स दिन’ साजरा केला जातो. या दिवशी, लोकांना त्याच्या प्रतिबंध आणि चाचणीबद्दल जागरूक केले जाते. भविष्यामध्ये आपण सर्वांनी एडस बाबत जागृत राहणे आवश्यक आहे आणि समाजामध्ये सुद्धा जागरूकता निर्माण करणे आवश्यक आहे यावेळी मोठ्या प्रमाणावर महाविद्यालयीन विद्यार्थी व विद्यार्थिनी हजर होते राष्ट्रीय स्वयंसेवा योजनेचे डॉ. विनोद अंभोरे यांनी सुद्धा एडस बद्दल जनजागृती केली तसेच डॉ सुकेशनी जाधव ,प्रा. सुरज पर्घमोर , प्रा .पूनम गोबाडे, श्रीमती . अनिता काकरवाल ,प्रा. निकिता तुपे, आसित शेगावकर, श्रीकांत पातोडे, आदी शिक्षक व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
What's Your Reaction?