मनसेनंतर आता मराठी पाट्यांसाठी शिवसेना आग्रही, दिला 7 दिवसांचा अल्टिमेटम...!

 0
मनसेनंतर आता मराठी पाट्यांसाठी शिवसेना आग्रही, दिला 7 दिवसांचा अल्टिमेटम...!

मनसेनंतर आता मराठी पाट्या वरुन शिवसेना आग्रही, 7 दिवसांचा दिला अल्टिमेटम...!

औरंगाबाद, दि.1(डि-24 न्यूज) शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने शिवसेनेचे शिष्टमंडळाने आयुक्त तथा प्रशासक, महानगरपालिका तसेच स्मार्ट सिटी कार्यालय येथे यांना भेटून जाहीर निवेदनद्वारे विनंती करण्यात आली की,

 सुप्रीम कोर्टाने आदेश दिलेला असताना शहरातील अनेक प्रतिष्ठान, मॉल, खाजगी, शासकीय कार्यालयावर इंग्रजी भाषेतील पाट्या काढून राजभाषा मराठीतील पाट्या लावणे संदर्भात तात्काळ कारवाई करावी या मागणीचे निवेदन दिले.

इंग्रजी नावाचे बोर्ड हटवा, मराठी नावातील पाट्या बसवा...

सर्वोच्च न्यायालयाने आदेश दिलेला असतांना शहरातील अनेक प्रतिष्ठान, मॉल, खाजगी, शासकीय कार्यालयावर इंग्रजी भाषेतील पाट्या आहेत, न्यायालयाने आदेश दिलेला असतानाही संबंधित या पाट्या काढून राजभाषा मराठीतील पाट्या लावत नसल्याचे लक्षात आलेले आहे, आदेशाचे पालन न करणाऱ्यांना सुरवातीला नोटिसा देऊन व नंतर स्वतःच्या अधिकारात या पाट्या काढून घेणे आवश्यक आहे, परंतु मनपाकडून कसलीही कार्यवाही होतांना दिसत नाही, मनपा प्रशासनाने येत्या 7 दिवसात इंग्रजी पाट्या काढून मराठी पाट्या लावल्या नाहीतर शिवसेना व व्यापारी महासंघ या पाट्या काढून टाकणार असा इशारा निवेदनाद्वारे दिला आहे. या नंतर होणाऱ्या परिस्थितीला मनपा जवाबदार राहील.

 शालेय पूरक आहार म्हणून विद्यार्थ्यांना अंडी न देता केळीचे वाटप अथवा इतर शाकाहारी पोष्टिक आहार देण्यात यावे.

केंद्र शासनाच्या सूचनेनुसार सर्व शाळांमध्ये विद्यार्थ्यांना पूरक आहार म्हणून अंडी देण्याचे नियोजन केलेले आहे. परंतु महानगरपालिका शाळांमधील विद्यार्थी हे बहुतांश वारकरी संप्रदायातील व इतर तत्सम संप्रदायातील असल्याने तसेच काही विद्यार्थी हे शाकाहारी असल्याकारणाने जर शाळेमध्ये अंडी वाटप केली तर शाकाहारी विद्यार्थ्यांची वेगळी रांग व अंडी खाणाऱ्यांची वेगळी रांग अशी केल्याने मुलांमध्ये लहानपणापासून वेगळेपणाची भावना निर्माण होईल. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षा तर्फे या केंद्र शासनाच्या सूचनेचा विरोध दर्शविण्यात येत आहे. तसेच आपण असे होऊ नये म्हणून महानगरपालिकेतील सर्व शाळांमधून अंडी ऐवजी पूरक आहार म्हणून केळी अथवा इतर शाकाहारी पोष्टिक आहार दिल्यास विद्यार्थ्यांना त्याचा फायदा होईल. करिता शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने जाहीर निवेदन देण्यात आहे.

याप्रसंगी जिल्हाप्रमुख किशनचंद तनवाणी यांच्या मार्गदर्शनाखाली शहरप्रमुख बाळासाहेब थोरात, विश्वनाथ स्वामी, ज्ञानेश्वर डांगे विधानसभा संघटक राजू वैद्य, सुशील खेडकर, उपजिल्हा प्रमुख नंदकुमार घोडेले, जयवंत ओक, सचिन जवेरी, आनंद तांदूळवाडीकर, अजय चावरिया, हिदायत अली मा.नगरसेवक मनोज गांगावे मकरंद कुलकर्णी, राजू खरे, आदींची उपस्थिती होती.

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow