ऑटोरिक्षा मिटर रिकॅलिब्रेशनसाठी 15 सप्टेंबर पर्यंत मुदतवाढ

 0
ऑटोरिक्षा मिटर रिकॅलिब्रेशनसाठी 15 सप्टेंबर पर्यंत मुदतवाढ

ऑटोरिक्षा मिटर रिकॅलिब्रेशनसाठी 15 सप्टेंबर पर्यंत मुदतवाढ

छ. संभाजीनगर(औरंगाबाद) दि.(डि-24 न्यूज)- प्रादेशिक परिवहन प्राधिकरणाने ऑटोरिक्षा मिटर दर निश्चित केले असून त्यासाठी ऑटोरिक्षा मिटर रिकॅलिब्रेशन करणे आवश्यक आहे. त्यासाठी दि.15 सप्टेंबर पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे, असे प्रादेशिक परिवहन प्राधिकरणाचे सदस्य सचिव तथा प्रादेशिक परिवहन अधिकारी यांनी कळविले आहे. हे दर प्रथम दिड किमी करता 26 रुपये तर नंतरच्या प्रत्येक किमी साठी 18 रुपये असे आहेत. हे दर दि.14 सप्टेंबर 2022 च्या बैठकीत निश्चित करण्यात आले होते. त्याकरीता करावयाच्या ऑटोरिक्षा मिटर कॅलिब्रेशनसाठी प्रथम 30 नोव्हेंबर 2022, नंतर 15 जानेवारी 2023 अशी मुदत देण्यात आली होती. तथापि, अद्यापही ऑटोरिक्षा मिटरचे रिकॅलिब्रेशन मोठ्या प्रमाणावर बाकी आहे. त्यामुळे आता 15 सप्टेंबर 2024 ही अंतिम मुदतवाढ देण्यात आली आहे. या मुदतीनंतर रिकॅलिब्रेशन न केल्यास दंड आकारण्यात येईल,असेही कळविण्यात आले आहे.

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow