जागेवरील अतिक्रमण हटविण्यासाठी पोलिसांनीच मिगितली 50 हजारांची लाच, पोलिस निरीक्षक व अंमलदार पसार

जागेवरील अतिक्रमण हटविण्यासाठी पोलिसांनीच घेतली 50 हजारांची लाच...
पुंडलिकनगर ठाण्याचे निरीक्षकासह लाच घेणारा अंमलदार पसार...
छ. संभाजीनगर(औरंगाबाद),दि.30(डि-24 न्यूज)
जमीनीवरील अतिक्रमण काढण्यासाठी एक लाखांची लाच मागून 50 हजारांचील लाच स्वीकारणाऱ्या पुंडलिकगनरच्या पोलीस अंमलदारासह पोलीस निरीक्षकाला एसीबीच्या पथकाने कारवाई केल्यानंतर त्याच पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.
विशेष म्हणजे अतिक्रमण न काढल्याने तक्रारदाराकडून घेतलेले पैसे दोन टप्प्यात परत करण्याचे आश्वासन निरीक्षकांनी दिले. हा सर्व प्रकार तक्रारदाराने मोबाइलमध्ये कैद केला आहे. राजेश सुदाम यादव (45, रा. वीटखेडा) असे अश्वासन देणाऱ्या पोलीस निरीक्षकाचे नाव आहे. तर सुरेश बाबूसिंग पवार (रा. गल्ली क्रं.3, जयभवानी नगर) असे 50 हजारांची लाच घेणाऱ्या पोलीस अंमलदाराचे नाव आहे. विशेष म्हणजे गुन्हा दाखल होण्याची भनक लागताच दोघेही पसार झाल्याची माहिती एसीबीच्या सुञांनी दिली.
प्रकरणात 38 वर्षीय व्यक्तीने तक्रार दिली. त्यानूसार, तक्रारदार यांच्या मालकीची गारखेडा परिसरातील रेणुकानगर येथे गट क्रं. 50/2/4 मध्ये 24 हजार स्क्वेअर फुट जमीन आहे. या जागेवर लोकांनी अतिक्रमण केले आहे. हे अतिक्रमण काढण्यासाठी पोलीस बंदोबस्त मिळावा यासाठी तक्रारदार यांनी पुंडलिकनगर पोलीस ठाण्यात रितसर अर्ज केला होता. 18 मार्च रोजी त्या जागेवरील अतिक्रमण काढण्यासाठी अंमलदार सुरेश पवार याने तक्रारदाराकडे 50 हजारांच्या लाचेची मागणी केली. तसेच पोलीस बंदोबस्त देऊन अतिक्रमण काढल्यानंतर, त्या जागेचा ताबा मिळवून दिल्यानंतर एक लाख रुपये साहेबांना देण्याचे ठरले. त्यानूसार 3 एप्रिल रोजी तक्रारदार यांनी अंमलदार पवार याला ठरल्याप्रमाणे 50 हजार रुपयांची लाच दिली. त्यानंतर देखील त्या जागेवरील अतिक्रमण न काढल्यामुळे, तक्रारदार यांनी अंमलदार पवार याची भेट घेऊन दिलेल्या पैशांची विचारणा केली. त्यावर पवार याने तक्रारदाराला निरीक्षक राजेश यादव यांच्या कॅबीनमध्ये नेवून उभे केले. तेंव्हा तक्रारदाराने अंमलदार पवार याला दिलेल्या 50 हजारांच्या लाचेबाबत विचारणा केली. तेंव्हा यादव याने तुमचे काम न झाल्याने, आम्ही तुमचे पैसे दोन टप्यात परत करु असे अश्वासन दिले. हा सर्व प्रकार तक्रारदाराने आपल्या मोबाइलमध्ये कैद केला. दरम्यान प्रकरणात तक्रारदार याने 26 जून रोजी लाचलुचपत प्रतिबंधक विभागात रितसर अर्ज केला व त्यासोबत मोबाइल मध्ये कैद केलेली सर्व व्हीडीओ रेकॉर्डींग देखील सादर केली. या सर्व प्रकरणाची एसीबीच्या पथकाने पडताळणी केली. त्यात लाचेची मागणी करुन ती स्वीकारल्याचे सिद्ध झाल्याने शुक्रवारी दि.30 पुंडलिकनगर पोलीस ठाण्यात लाच स्वीकारणाऱ्या अंमलदारासह, पैसे परत करण्याचे आश्वासन देणाऱ्या ठाण्याचे निरीक्षक राजेश यादव याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
ही कारवाई सापळा लाच लुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलीस अधिक्षक संदीप आटोळे यांच्या मागदर्शनाखाली अपर अधिक्षक मुकुंद अघाव, उपाधिक्षक राजीव तळेकर, सुरेश नाईकनवरे, हवालदार प्रकाश घुगरे, अशोक नागरगोजे, अंमलदार सी.एन. बागुल आदींनी केली.
निरीक्षकासह अंमलदारही पसार
दरम्यान आपल्या विरोधात एसबीचे पथक गुन्हा दाखल करणार असल्याची माहिती मिळताच निरीक्षक राजेश यादव आणि अंमलदार पवार हे दोघेही पसार झाले आहेत. दरम्यान दोघांचा शोध घेत असल्याचे उपधिक्षक राजीव तळेकर यांनी सांगितले.
What's Your Reaction?






