गावठी कट्यासह जिवंत काडतुस बाळगणारा सराईत गुन्हेगार जेरबंद

 0
गावठी कट्यासह जिवंत काडतुस बाळगणारा सराईत गुन्हेगार जेरबंद

गावठी कट्यासह जिवंत काडतूस बाळगणारा सराईत गुन्हेगार जेरबंद

गंगापूर,दि.11(डि-24 न्यूज) गावठी कट्टासह दोन जिवंत काडतुस सोबत बाळगणारा सराईत पाहिजे असलेला आरोपी गंगापुर पोलीसांनी पाठलाग करून केला जेरबंद केले.

काल रात्री 9 वाजेच्या सुमारास पोलीस निरीक्षक सत्यजीत ताईतवाले हे त्यांचे पथकासह जामगाव परिसरात पेट्रालिंग करत असतांना त्यांना गोपनीय बातमीदारा मार्फत माहिती मिळाली कि, गंगापुर पोलीसांना पाहिजे असलेला सराईत आरोपी नामे महेश काशिनाथ काळे रा. जामगाव ता. गंगापुर हा त्याचे गावी जामगाव येथे आला असुन तो रात्रीच्या वेळी दारू पिण्यासाठी जयहिंद साखर कारखाना परिसरात पायी जात असतो यावेळी त्याचे जवळ तो गावठी कट्टी जवळ बाळगतो.

 या माहितीच्या आधारे पो.नि. सत्यजीत ताईतवाले व त्यांचे पथकांने तात्काळ जामगाव च्या दिशेने धाव घेवुन जयहिंद साखर कारखान्याच्या अलिकडे शेतात अंधारात आडोशाला सापळा लावला. यावेळी संशयीत ईसम महेश काळे हा दबा धरून बसलेल्या पोलीसांचे दिशेने येतांना पोलीसांचे नजरेस पडला तो पाहिजे असलेला आरोपी महेश काळे असल्याची पोलीसांना खात्री होताच पोलीसांनी त्याचे दिशेने धाव घेतली असता पोलीसांचे हालचाल पाहताच महेश काळे यांने अंधाराचा फायदा घेत तो जिल्हा परिषद शाळेच्या दिशेने पळत सुटला यावेळी पोलीसांनी त्याचा कसून पाठलाग करून त्याला थोडयाच अंतराव शिताफिने पकडले.

 यावेळी त्याला विश्वासात घेऊन त्याचे नाव गाव विचारले असता त्याने त्याचे नाव महेश काशिनाथ काळे वय 28 वर्ष रा.जामगाव ता. गंगापूर असे सांगितले यावेळी त्याची अंगझडती घेतली असता त्याचे कमरेला जवळ एक स्टिलच्या धातुचा काळया रंगाचा गावठी कट्टा व दोन जिवंत काडतुस (राऊंड ) अवैधरित्या विनापरवाना जवळ बाळगतांना मिळून आला आहे. गावठी कट्टा व काडतुस जप्त करण्यात आली आहेत. नमुद आरोपी विरूध्द आतापर्यत प्राणघातक हल्ला करणे, चोरी, दरोडा, मारहाण, अवैध शस्त्र बाळगणे, विक्री करणे इत्यादी सारखे 14 गंभीर गुन्हे दाखल असुन यापैकी 4 गंभीर गुन्हयात तो गंगापुर पोलीसांना पाहिजे होता.

 त्याचे विरूध्द पोलीस ठाणे गंगापुर येथे कलम 3,25 भारतीय हत्यार कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला असुन पुढील तपास गंगापुर पोलीस करित आहेत.

 सदरची कारवाई मनिष कलवानिया, पोलीस अधीक्षक, सुनिल कृष्णा लांजेवार, अपर पोलीस अधीक्षक, महक स्वामी, सहा. पोलीस अधीक्षक, वैजापुर चार्ज, उपविभागीय पोलीस अधिकारी, गंगापुर, यांचे मार्गदर्शनाखाली श्री सत्यजीत ताईतवाले, पोलीस निरीक्षक, पोलीस अंमलदार दिनकर थोरे, अमोल कांबळे, अभिजीत डहाळे, अतुल भवर, विजय नागरे, राहुल वडमारे, तेनसिंग राठोड, यांनी केली आहे.

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow