काठ पदर... ऐतिहासिक पैठणीचे प्रदर्शन शुक्रवार पासून

 0
काठ पदर... ऐतिहासिक पैठणीचे प्रदर्शन शुक्रवार पासून

काठ पदर... ऐतिहासिक पैठणीचे प्रदर्शन शुक्रवार पासून

औरंगाबाद, दि.11(डि-24 न्यूज) काठ पदर... ऐतिहासिक पैठणी साडीचे प्रदर्शन शुक्रवार पासून पैठण नगरीत होणार आहे. शुक्रवारी 20 ऑक्टोबर ते 28 ऑक्टोबर पर्यंत सकाळी 10.30 ते सायंकाळी 5.30 वाजेपर्यंत हे प्रदर्शन सर्वांसाठी मोफत खुले असणार आहे. हे प्रदर्शन बघण्यासाठी अगोदर नोंदणी आवश्यक आहे. अशी माहिती पत्रकार परिषदेत TVAM फाँडेशनचे विश्वस्त श्रीमती रसिका वाकलकर यांनी दिली आहे.

पुरातत्व व वस्तुसंग्रहालय संचालनालय, महाराष्ट्र शासन आणि TVAM फाँडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने बाळासाहेब पाटील शासकीय संग्रहालय, पैठण येथे ऐतिहासिक पैठणी साडीचे प्रदर्शन काठ पदर - पैठणी अँड बइयआॅड आयोजित केले असून या प्रदर्शनामध्ये श्री छत्रपती शिवाजी महाराज वस्तुसंग्रहालय, सातारा औंध येथील श्री भवानी वस्तुसंग्रहालय व ग्रंथालय आणि नागपूर येथील मध्यवर्ती वस्तुसंग्रहालयाच्या संग्रहातून प्रदर्शनातील पैठणी साडी, शेला यांचा समावेश आहे.

या प्रदर्शनात महाराष्ट्रातील प्रसिद्ध पैठणी या साडी वस्त्रप्रकारातील विविध काळातील ऐतिहासिक साड्या पहिल्यांदाच पैठणमध्ये पहायला मिळणार आहे. पैठणी ही भारतातील हातमागावर विणलेल्या कापडाच्या सर्वात वैशिष्ट्य पूर्ण प्रकारांपैकी मानली जाते.

मयंक मानसिंग कौल हे प्रदर्शनाचे वस्त्र अभिरक्षक असून लोकस डिझाईन यांनी या प्रदर्शनाची रचना केली आहे. श्रीमती रेहा सोधी यांनी मोनोग्राफची रचना केली आहे. यामध्ये पैठणच्या इतिहासापासून ते स्थापत्य शास्त्रा पर्यंतचा तसेच पैठणच्या संस्कृती बद्दलच्या विविध पैलूंवर प्रकाश टाकणारे प्रख्यात वक्त्यांचे भाषण , पैठणच्या विनकरांशी संवाद आणि शहरातील महत्त्वाच्या पुरातत्व शास्त्रीय स्थळांना भेटी असा कार्यक्रम आहे.

20 ऑक्टोबर उद्घाटन या दिवशी स्वागत संबोधन रसिका वाकलकर हे करतील. मोनोग्राफचे प्रकाशन, प्रख्यात इतिहासकार डॉ.आर.एस.मोरवंचिकर यांचे आशीर्वाद पर मनोगत, श्रीमती रिता कपूर चिश्ति, साडी वस्त्र इतिहासकार आणि वस्त्र विषयातील तज्ञ यांचे विणकाम संस्कृती बद्दलच्या वैयक्तिक अनुभव महाराष्ट्र, 40 वर्षांचा विणकाम प्रवास, पैठणचे पुरातत्व आणि महाराष्ट्राचे विहंगावलोकन संग्रहालय संस्कृती डॉ. तेजस गर्गे, संचालक पुरातत्व व वस्तुसंग्रहालय संचालनालय महाराष्ट्र, राज्य वस्त्रोद्योग धोरण -2023-2028 मधील महाराष्ट्रातील हातमाग, वीरेंद्र सिंग, सचिव, वस्त्र विभाग, महाराष्ट्र शासन, आजच्या युगातील पैठणी, पैठणी विणकाम आणि त्या वस्त्राच्या पूर्णत्वाची प्रक्रिया, पैठण मधील विनकरांशी संवाद,

ऐतिहासिक पैठणीवर मार्गदर्शन व समालोचन, मयंक मानसिंग कौल, वस्त्र अभिरक्षक, काठ पदर, पैठण येथील वाडे, ASI स्थळे, तसेच पैठणच्या सांस्कृतिक स्थळांना भेटी दिली जाणार, श्रीमती तेजस्विनी आफळे, संवर्धन वास्तुविशारद, पुरातत्व शास्त्रज्ञ आणि आर्किटेक्चर इतिहासकार. असा हा कार्यक्रम आहे. जास्तीत जास्त लोकांनी या कार्यक्रमाला सहभागी होऊन लाभ घ्यावा असे आवाहन आयोजकांनी केले आहे. पत्रकार परिषदेत सिएमआयचे अध्यक्ष दुष्यंत पाटील, सचिव उत्सव माच्छर, कोषाध्यक्ष अथर्देशराज नंदावत उपस्थित होते.

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow