तर नोबेलचे पहिले मानकरी डॉ.बाबासाहेब आंबेडकर असते- डॉ.रमेश गोलाईत
"नोबेल" चे पहिले मानकरी डॉ. आंबेडकर असते,
रिझर्व बँक ऑफ इंडियाचे उपसंचालक
डॉ.रमेश गोलाईत यांचे प्रतिपादन
औरंगाबाद, दि.14(डि-24 न्यूज ) जर पन्नासच्या दशकात अर्थशास्त्रामध्ये नोबेल पारितोषिक सुरू झाले असते तर प्रथम पारितोषिक थोर अर्थतज्ज्ञ डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनाच मिळाले असते, एवढेच नव्हे तर अर्थशास्त्रातील महान संशोधनाबद्दल डॉ.बाबासाहेब आंबेडकरांना लागोपाठ सलग तीन वेळाही नोबेल पारितोषिक मिळाले असते, असे प्रतिपादन भारतीय रिझर्व बँकेचे (मुंबई ) डेप्युटी डायरेक्टर ज्येष्ठ अर्थशास्त्रज्ञ डॉ.रमेश गोलाईत यांनी केले.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर मेडिकोज असोसिएशन (डामा) हेल्थ केअर फाउंडेशनच्यावतीने आयोजित पदग्रहण तसेच भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंती समारंभात प्रमुख वक्ते म्हणून ते बोलत होते, महाराष्ट्र राज्य आरोग्य सेवा विभागाचे डेप्युटी डायरेक्टर डॉ.भूषण कुमार रामटेके , शासकीय वैद्यकीय महाविद्यालय-रुग्णालयाचे उप अधिष्ठाता डॉ.भारत सोनवणे हे यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. डॉ. बाबासाहेब आंबेडकर मेडिकोज असोसिएशन( डामा) हेल्थ केअर फाउंडेशनचे अध्यक्ष सुप्रसिद्ध कॅन्सर सर्जन डॉ. एम.डी.गायकवाड हे समारंभाच्या अध्यक्षस्थानी होते.
आरबीआयचे डेप्युटी डायरेक्टर डॉ.गोलाईत पुढे म्हणाले की,डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या इतकी बुद्धिमत्ता असलेला अर्थतज्ज्ञ त्यावेळी भारतात कोणी नव्हता. अर्थशास्त्रीय संशोधनाबद्दल त्यांना सलग तीन वेळा नोबल पारितोषिक मिळाले असते एवढे अर्थशास्त्रातील त्यांचे कार्य महान होते. ते पुढे म्हणाले, डॉ. आंबेडकरांना घटनेचे शिल्पकार व अन्य उपाध्यांमध्येच सीमित करण्यात आले आहे,त्यांच्या प्रबंधाने भारतीय अर्थविश्व आणि त्याची सर्व सूत्रे हाती असलेल्या ब्रिटिश अर्थविश्वात एक निर्णय भूमिका बजावली ,त्यातूनच आज भारतीय अर्थव्यवस्थेचा डोलारा सांभाळणारी रिझर्व बँक ऑफ इंडिया उभी राहिली आहे. डॉ.गोलाईत यांच्या या भाषणाने प्रभावित सभागृहांने एक मिनिटे उभे राहून टाळ्यांचा कडकडाट करत त्यांना दात दिली.
आरोग्य विभागाचे डेप्युटी डायरेक्टर डॉ. भूषण कुमार रामटेके यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवनात बुद्ध कबीर व फुले या तीन गुरूंचे तसेच विद्या स्वाभिमान व शील या तीन दैवतांचे अतिशय महत्त्व असल्याचे सांगितले, डॉ. आंबेडकरांनी या गोष्टीचा आपल्या संपूर्ण जीवनात अनेक ठिकाणी उल्लेख केल्याचा उहापोह देखील डॉ.रामटेके यांनी केला.
घाटीचे उपअधिष्ठाता डॉ.भारत सोनवणे यांनी आपण समाजाचे देणे लागतो ही भावना मनात ठेवून सर्वांनी कार्य केले पाहिजे,काळाची ती गरज आहे असे सांगितले.
अध्यक्षीय समारोप करताना डॉ.बाबासाहेब आंबेडकर मेडिकोज असोसिएशन (ड्रामा) हेल्थ केअर फाउंडेशनचे अध्यक्ष डॉ.एम.डी. गायकवाड यांनी शहरात लवकरच 500 बेडचे मल्टी स्पेशलिटी आणि सुपर स्पेशलिटी हॉस्पिटल उभारण्यात येणार असल्याचा संकल्प जाहीर केला.त्यामध्ये अलोपॅथिक ,आयुर्वेदिक, होमिओपॅथिक तसेच डेंटल या वैद्यकीय शाखेतील सर्व डॉक्टरांचे सहकार्य घेण्यात येईल.शासकीय वैद्यकीय महाविद्यालयामध्ये शिकणाऱ्या आर्थिक कमकुवत विद्यार्थ्यांसाठी दत्तक योजना सुरू करून त्यांना आर्थिक मदतीचा हातभार लावला जाईल. आगामी दहा वर्षात आंबेडकरी डॉक्टरांना या हॉस्पिटलमध्ये सामावून घेतले जाईल. सामाजिक उत्तरदायित्व म्हणून शहरातील सर्व बुद्धविहारांमध्ये सुपर स्पेशालिटी डॉक्टरांची विनामूल्य सेवा गरजू रुग्णांना देण्यात येईल असेही डॉ. गायकवाड यांनी सांगितले.
प्रारंभी, तथागत भगवान बुद्ध व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमांसमोर दीप प्रज्वलन करण्यात आले. 'डामा'चे जनरल सेक्रेटरी डॉ.विशाल वाठोरे यांनी प्रास्ताविक केले.यावेळी 45 डॉक्टरांनी पदग्रहण केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. मनीषा अंभोरे यांनी केले तर आभार डॉ. संजय पगारे यांनी मानले.'डामा'चे उपाध्यक्ष डॉ.प्रमोद दुथडे ,डॉ. विना गायकवाड, डॉ. प्रमोद धनजकर ,डॉ. प्रवीण चाबुकस्वार, डॉ. प्रज्ञा बनसोडे,डॉ.अविनाश सोनवणे, डॉ. साहेब वाकडे, डॉ.सागर वानखेडे, डॉ. नचिकेत शेरे,डॉ.सलेना लोणारे, डॉ. श्रुती चिंचखेडे यांनी कार्यक्रम यशस्वीतेसाठी परिश्रम घेतले.शेवटी राष्ट्रगीतांने कार्यक्रमाचा समारोप करण्यात आला.आहे,त्यांच्या प्रबंधाने भारतीय अर्थविश्व आणि त्याची सर्व सूत्रे हाती असलेल्या ब्रिटिश अर्थविश्वात एक निर्णय भूमिका बजावली ,त्यातूनच आज भारतीय अर्थव्यवस्थेचा डोलारा सांभाळणारी रिझर्व बँक ऑफ इंडिया उभी राहिली आहे. डॉ.गोलाईत यांच्या या भाषणाने प्रभावित सभागृहांने एक मिनिटे उभे राहून टाळ्यांचा कडकडाट करत त्यांना दात दिली.
आरोग्य विभागाचे डेप्युटी डायरेक्टर डॉ. भूषण कुमार रामटेके यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवनात बुद्ध कबीर व फुले या तीन गुरूंचे तसेच विद्या स्वाभिमान व शील या तीन दैवतांचे अतिशय महत्त्व असल्याचे सांगितले, डॉ. आंबेडकरांनी या गोष्टीचा आपल्या संपूर्ण जीवनात अनेक ठिकाणी उल्लेख केल्याचा उहापोह देखील डॉ.रामटेके यांनी केला.
घाटीचे उपअधिष्ठाता डॉ.भारत सोनवणे यांनी आपण समाजाचे देणे लागतो ही भावना मनात ठेवून सर्वांनी कार्य केले पाहिजे,काळाची ती गरज आहे असे सांगितले.
अध्यक्षीय समारोप करताना डॉ.बाबासाहेब आंबेडकर मेडिकोज असोसिएशन (ड्रामा) हेल्थ केअर फाउंडेशनचे अध्यक्ष डॉ.एम.डी. गायकवाड यांनी शहरात लवकरच 500 बेडचे मल्टी स्पेशलिटी आणि सुपर स्पेशलिटी हॉस्पिटल उभारण्यात येणार असल्याचा संकल्प जाहीर केला.त्यामध्ये अलोपॅथिक ,आयुर्वेदिक, होमिओपॅथिक तसेच डेंटल या वैद्यकीय शाखेतील सर्व डॉक्टरांचे सहकार्य घेण्यात येईल. शासकीय वैद्यकीय महाविद्यालयामध्ये शिकणाऱ्या आर्थिक कमकुवत विद्यार्थ्यांसाठी दत्तक योजना सुरू करून त्यांना आर्थिक मदतीचा हातभार लावला जाईल. आगामी दहा वर्षात आंबेडकरी डॉक्टरांना या हॉस्पिटलमध्ये सामावून घेतले जाईल. सामाजिक उत्तरदायित्व म्हणून शहरातील सर्व बुद्धविहारांमध्ये सुपर स्पेशालिटी डॉक्टरांची विनामूल्य सेवा गरजू रुग्णांना देण्यात येईल असेही डॉ. गायकवाड यांनी सांगितले.
प्रारंभी, तथागत भगवान बुद्ध व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमांसमोर दीप प्रज्वलन करण्यात आले. 'डामा'चे जनरल सेक्रेटरी डॉ.विशाल वाठोरे यांनी प्रास्ताविक केले. यावेळी 45 डॉक्टरांनी पदग्रहण केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. मनीषा अंभोरे यांनी केले तर आभार डॉ. संजय पगारे यांनी मानले.'डामा'चे उपाध्यक्ष डॉ.प्रमोद दुथडे ,डॉ. विना गायकवाड, डॉ. प्रमोद धनजकर ,डॉ. प्रवीण चाबुकस्वार, डॉ. प्रज्ञा बनसोडे,डॉ.अविनाश सोनवणे, डॉ. साहेब वाकडे, डॉ.सागर वानखेडे, डॉ. नचिकेत शेरे,डॉ.सलेना लोणारे, डॉ. श्रुती चिंचखेडे यांनी कार्यक्रम यशस्वीतेसाठी परिश्रम घेतले.शेवटी राष्ट्रगीतांने कार्यक्रमाचा समारोप करण्यात आला.
What's Your Reaction?