नीट परीक्षेच्या निकालावर प्रश्नचिन्ह, सीबीआय चौकशीची मागणी, आरोग्यमंत्री म्हणाले सरकार विद्यार्थ्यांच्या पाठीशी...!

 0
नीट परीक्षेच्या निकालावर प्रश्नचिन्ह, सीबीआय चौकशीची मागणी, आरोग्यमंत्री म्हणाले सरकार विद्यार्थ्यांच्या पाठीशी...!

नीट परीक्षेच्या निकालावर प्रश्नचिन्ह, सिबिआय चौकशीची मागणी, आरोग्य मंत्री म्हणाले सरकार विद्यार्थ्यांच्या पाठीशी...!

नीट परीक्षेच्या घोटाळ्यामुळे विद्यार्थ्यांचे आयुष्य उद्ध्वस्त होण्याच्या मार्गावर आहे हि परीक्षा रद्द करुन पुन्हा हि परीक्षा घेण्याची मागणी विरोधीपक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी केली आहे...67 विद्यार्थ्यांना पैकीचे पैकी 720 मार्क कसे, वेळ वाढवून का दिले, विद्यार्थ्यांची उच्च न्यायालयात धाव...!

मुंबई, दि.8(डि-24 न्यूज)

लोकसभेच्या निकालाच्या दिवशीच नीट परीक्षेचा निकाल जाहीर झाल्याने या निकालावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. या निकालामुळे विद्यार्थी व पालकांमध्ये नाराजी आहे. नीट-युजी परीक्षा आणि निकालासंबंधी सर्व माहीतीचे फाॅरेन्सिक ऑडिट करण्यासाठी व त्याची सीबीआयकडून चौकशी करण्याकरिता पंतप्रधान कार्यालयला आणि नॅशनल मेडीकल कमिशन(NMC) ला पत्र लिहिणार असल्याचे राज्याचे वैद्यकीय शिक्षणमंत्री हसन मुश्रीफ यांनी स्पष्ट केले आहे.

इंडियन मेडिकल असोसिएशनने(IMA) देखील सीबीआय चौकशीची मागणी करत चौकशी पूर्ण झाल्याशिवाय प्रवेश प्रक्रिया सुरू करु नये अशी मागणी NMC कडे केली आहे. वैद्यकीय अभ्यासक्रम प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थी पालकांनी वैद्यकीय शिक्षणमंत्री हसन मुश्रीफ यांची भेट घेऊन नीट-युजीसीत देण्यात आलेले ग्रेस मार्क रद्द करुन सुधारीत निकाल लागेपर्यंत प्रवेश प्रक्रिया स्थगित करण्याची मागणी केली आहे. 

पालक शेख युसूफ यांनी डि-24 न्यूजला सांगितले एनटिएसने ग्रेस मार्काच्या नावाखाली शंभर ते दिडशे गुणांची खिरापत काही विद्यार्थ्यांना वाटली आहे. त्यामुळे कटऑफ वाढणार असल्याने राज्यातील सरकारी वैद्यकीय महाविद्यालय सोडाच खाजगी मेडीकल कॉलेजमध्ये प्रवेश मिळणे कठीण होणार आहे.

जोपर्यंत विद्यार्थ्यांना न्याय मिळणार नाही तोपर्यंत त्यांच्या पाठीशी उभे राहण्याचे आश्वासन हसन मुश्रीफ यांनी दिले आहे.

नीट युजीसीच्या माहिती पत्रकात कुठेही वेळ कमी पडल्याने ग्रेस मार्क देण्याचा मुद्दा समाविष्ट नव्हता तरीही दिड हजारांहून अधिक विद्यार्थ्यांना ग्रेस मार्क दिल्याने ऑल इंडिया रैंकींगमध्ये कमालीची वाढ झाली आहे. OMR शिट आणि गुण स्कोअर कार्डशी जुळत नसल्याची पालकांची तक्रार आहे.

नीट परीक्षेत घोटाळा झाल्याचा आरोप विरोधीपक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी करत यामुळे विद्यार्थ्यांचे भविष्य उध्वस्त होण्याच्या मार्गावर आहे यामुळे हि परीक्षा रद्द करुन पुन्हा घ्यावी अशी मागणी त्यांनी केली आहे. एशियन हाॅस्पीटलचे चैयरमन डॉ.शोएब हाश्मी यांनी या परीक्षेची चौकशी करून दोषींवर कारवाई करुन विद्यार्थ्यांना न्याय मिळवून द्यावा अशी मागणी केली आहे.

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow