धोकादायक इमारतींवर फिरणार बुलडोझर, मोंढ्यातील इमारत पाडली

 0
धोकादायक इमारतींवर फिरणार बुलडोझर, मोंढ्यातील इमारत पाडली

मोंढ्यातील धोकादायक इमारत पाडली...

धोकादायक इमारतींवर आता फिरणार बुलडोझर...

औरंगाबाद, दि.7(डि-24 न्यूज ) महानगरपालिकेच्या वतीने मनपा तर्फे धोकादायक इमारतीवर कारवाई सुरू करण्यात आली आहे.

आज रोजी आयुक्त तथा प्रशासक जी श्रीकांत यांच्या यांचे आदेशाने अतिरिक्त आयुक्त संतोष वाहुळे यांचे निर्देशानुसार मोंढा येथील संजय हनुमानदास टकसाली यांची इमारत घर क्रमांक चार 17/ 64 नगर भूमापन क्रमांक 8949 सदर सदर मिळकत चे बांधकाम खूप जुने असून जीर्ण झाले होते. सदर मिळकत ही जुन्या मुख्य बाजारपेठ येथे वर्दळीच्या ठिकाणी असल्याने कोणतेही क्षणी इमारत कोसळण्याची दाट शक्यता निर्माण झाली होती. सदरील मिळकतीस मनपाद्वारे अनेक वर्षापासून धोकादायक इमारतीची नोटीस महाराष्ट्र महानगर अधिनियम 1949 चे कलम 264 , 265 व 246 अन्वव्ये धोकादायक इमारतीची नोटीस बजावण्यात आली होती. अद्यापही नोटीस देऊन सुद्धा मोडकळीस आलेला भाग सबंधित मालमत्ता धारकांनी काढला नाही त्यामुळे नागरिकांसाठी धोकादायक असलेली इमारत मनपा तर्फे पाडण्यात आली.

 सदर कारवाई अतिरिक्त आयुक्त -२ संतोष वाहुळे यांच्या आदेशाने उपायुक्त सविता सोनवणे यांचे मार्गदर्शनाखाली पद निर्देशित अधिकारी रमेश मोरे, इमारत निरीक्षक मोहम्मद मजहर अली व रामेश्वर सुरासे यांनी पार पाडली. यावेळी मोडकळीस आलेल्या इमारतीचा भाग पाडताना काही लोकांतर्फे विरोध करण्यात आला होता या विरोधला न जुमानता कार्यवाही पूर्ण करण्यात आली.

अशी माहिती अतिक्रमण विभागाच्या वतीने देण्यात आली आहे.

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow