शाहनुरवाडी, शम्सनगरमध्ये पाण्याची पाइपलाइन टाकली तरीही नागरीकांचा घसा कोरडाच, मनपा प्रशासनाने दिले आश्वासन...
शाहनूरवाडी शम्सनगरमध्ये पाण्याची पाइपलाइन टाकली पण नागरीकांचा घसा कोरडा, मनपा प्रशासनाने दिले
आश्वासन...!
छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद), दि.11(डि-24 न्यूज) - शहरातील उस्मानपुरा वार्डातील शाहनुरवाडी, शम्स नगर हि वस्ती 30 वर्षं जुनी वस्ती आहे आतापर्यंत महापालिकेच्या वतीने येथे पिण्याचे पाणी पोहोचले नाही पाण्यापासून येथील नागरिक अनेकदा निवेदने देऊन त्रस्त झाले आहेत. महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या वतीने 600 मिटरची पाण्याची पाइपलाइन टाकून दिड वर्षे उलटली तरीही नळाचे कनेक्शन देण्यात आले नसल्याने येथील रहीवाशी नागरीकांचा पाण्याविना घसा आतापर्यंत कोरडाच आहे. 30 जानेवारी 2025 रोजी उप अभियंता पाणीपुरवठा यांना कनेक्शन जोडण्यासाठी अर्ज दिला होता. त्या अर्जाच्या आधारे उप अभियंता पाणीपुरवठा यांनी कार्यकारी अभियंता, महाराष्ट्र जीवन प्राधिकरण 13 फेब्रुवारी रोजी नळ कनेक्शन जोडण्यासाठी पत्र दिले होते. परंतु आतापर्यंत कनेक्शन दिले नाही म्हणून संतप्त नागरिक व महीलांनी आज दुपारी महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त - 2 कल्पिता किशोर पिंगळे यांना निवेदन देऊन सविस्तर चर्चा केली. त्यांनी पाणी पुरवठा अधिकारी यांच्याशी नागरीकांचे फोनवरून संभाषण करून दिले. फेब्रुवारी ते मार्च - 2026 पर्यंत मुबलक पाणी मिळेल असे आश्वासन दिले. परंतु येथील नागरिक लवकरात लवकर पाण्याचा प्रश्न सोडवावा असा पवित्रा घेतला. मागणीवर निर्णय घेतला नाही तर 12 डिसेंबरला महापालिकेसमोर हंडा मोर्चा काढण्याचा इशारा यावेळी देण्यात आला आहे.
सामाजिक कार्यकर्ते रिझवान पठाण व यास्मिन कुरेशी यांच्या नेतृत्वाखाली हे निवेदन मनपा प्रशासनाला दिले. याप्रसंगी पत्रकार शेख उस्मान, दिनेश परदेशी, अशोक गायकवाड, कृष्णा चौधरी, पुरनसिंग चौधरी, रेश्मा फेरोज खान, राणी खान, अब्दुल गफुर शेख व रहिवासी महीला मोठ्या संख्येने उपस्थित होते.
What's Your Reaction?