अपघातग्रस्तांची मदत करत विरोधीपक्षनेते अंबादास दानवे यांनी दाखवली माणूसकी

 0
अपघातग्रस्तांची मदत करत विरोधीपक्षनेते अंबादास दानवे यांनी दाखवली माणूसकी

 अपघातग्रस्तांची मदत करत विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी दाखवली माणुसकी

छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद), दि.9(डि-24 न्यूज) गंगापूर लासूर - कानोरी रस्त्यावर आज संध्याकाळी सहा वाजता दोन दुचाकींमध्ये झालेल्या भीषण अपघातात दोन तरुण जखमी झाले. हा अपघात कानोरी गावाजवळ घडला. घटनास्थळी पडलेल्या जखमींना मदतीची नितांत गरज होती, आणि त्याच वेळी तिथून जात असलेल्या विधान परिषद विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांची नजर त्या दिशेला गेली.

अपघाताचे दृश्य पाहताच दानवे यांनी क्षणाचाही विलंब न करता आपला ताफा थांबवला. परिस्थितीचं गांभीर्य ओळखून त्यांनी आपल्या गाडीतून जखमींना उचलून तातडीने लासूर स्टेशन येथील हॉस्पिटलमध्ये रवाना केलं.

या अपघातात अलीम पठाण (लासूर स्टेशन) आणि सूरज लकवाल (कानोरी) हे गंभीर जखमी झाले. रस्त्यावर मदतीसाठी कोणाचीही प्रतीक्षा न करता दानवे यांनी दाखवलेली तत्परता आणि माणुसकी समाजासमोर एक आदर्श ठेवणारी ठरली.

राजकारणाच्या पलीकडे जाऊन "माणूस" म्हणून त्यांनी जे कर्तव्य बजावलं, ते लाख मोलाचं आहे. संकटसमयी माणुसकीचा हात पुढे करणारा नेता समाजासाठी किती महत्त्वाचा असतो, हे आज पुन्हा सिद्ध झालं.

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow