हर्सुल, पंतप्रधान आवास योजनेच्या जागेवरील अतिक्रमण काढण्यासाठी पाच दिवसांचे अल्टिमेटम

हर्सूल येथील पंतप्रधान आवास योजनेच्या जागेवरील अतिक्रमणाची पाहणी
नागरिकांना पाच दिवसांची मुदत...
छत्रपती संभाजीनगर(औरंगाबाद), दि.17(डि-24 न्यूज) महानगरपालिकेच्या वतीने हर्सूल तलाव परिसर गट न.216 व 217 येथे पंतप्रधान आवास योजनांतर्गत नागरिकांना घरे देण्यात येणार आहे.
या जागेवर जवळपास शंभर ते दिडशे नागरिकांनी पत्र्याचे शेड चे अतिक्रमण केले आहे. आज अतिरिक्त आयुक्त संतोष वाहुळे यांच्या मार्गदर्शनाखाली या ठिकाणी स्थळ पाहणी करण्यात आली. या सर्व अतिक्रमण धारकांना आयुक्त तथा प्रशासक जी श्रीकांत यांच्या निर्देशानुसार अतिरिक्त आयुक्त संतोष वाहुळे यांनी नागरिकांनी स्वतः हून अतिक्रमणे काढण्यासाठी पाच दिवसांची मुदत दिली आहे. या स्थळ पाहणी वेळी उप आयुक्त 1 सविता सोनवणे, पदनिर्देशित अधिकारी अशोक गिरी,इ मारत निरीक्षक अश्विनी कोथलकर ,रविंद्र देसाई, नागरी मित्र पथक प्रमुख प्रमोद जाधव,
पंतप्रधान आवास योजनेचे मुंढे यांची उपस्थिती होती. पंतप्रधान आवास योजने अंतर्गत नागरिकांनी अर्ज केल्यास नागरिकांना घरे देण्याचा पर्याय प्रशासनाच्या वतीने ठेवण्यात आला आहे. परंतु सदर नागरिकांनी कुठल्याही प्रकारचा प्रतिसाद दिला नाही.
सदर ठिकाणचे अतिक्रमण नागरिकांनी दिलेल्या मुदतीत स्वतः काढून घ्यावे. अन्यथा महानगरपालिकेच्या वतीने अतिक्रमण काढण्याची कारवाई प्रस्तावित करण्यात येणार आहे. या कारवाई दरम्यान कुठलेही जप्त केलेले साहित्य परत मिळणार नाही. असे अतिक्रमण विभागाच्या वतीने कळविण्यात आ
ले आहे.
What's Your Reaction?






