पवित्र रमजान महिन्याच्या पहिल्या रोजा इफ्तार खरेदीसाठी बाजारपेठेत गर्दी...
पवित्र रमजान पहीला रोजा इफ्तार खरेदीसाठी बाजारपेठेत गर्दी
खवय्यांसाठी अनेक डिशेशची मेजवानी
छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद), दि.19(डि-24 न्यूज) - पवित्र रमजान महिन्याचा आज पहील्या रोजासाठी फळे व विविध खाद्यपदार्थ खरेदीसाठी रोजेदारांनी बाजारपेठेत गर्दी केली होती. कलिंगड, खरबूज, पपई, सफरचंद, संत्रा, मोसंबी, अनार, काकडी, चिकू, भजे, समोसे, हैदराबादी हरिस, हालिम, चायनीज व अनेक खाद्यपदार्थ खरेदीसाठी गर्दी झाली होती. कटकट गेट येथे मुस्तबा आदम यांच्या हैदराबादी हरिस व विविध डिशेस खरेदीसाठी ग्राहकांची गर्दी झाली होती. रोशन गेट, शहागंज, बुढीलेन, गणेश काॅलनी, रोजाबाग, सिटी चौक व शहरातील विविध भागात इफ्तार साठी विशेष बाजारपेठेत गर्दी दिसून आली. यावेळी रोजेदारांनी समाधान व्यक्त केले
.
What's Your Reaction?