उद्या राज ठाकरे उपोषणस्थळी भेट देणार- बाळा नांदगावकर
उद्या राज ठाकरे उपोषणस्थळी भेट देणार- बाळा नांदगावकर
औरंगाबाद, दि.3(डि-24 न्यूज) मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी अंबड तालुक्यातील अंतरवाली सराटी येथे आंदोलकांवर अमाणूषपणे पोलिसांचा लाठीचार्ज करण्यात आला. याचे पडसाद राज्यभर उमटत आहेत. उद्या सकाळी आठ वाजता महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे हे उपोषणस्थळी भेट देणार आहेत अशी माहिती पत्रकार परिषदेत मनसेचे नेते बाळा नांदगावकर यांनी दिली आहे. अगोदर उपोषणस्थळी भेट देऊन त्यांनी मनोज जरांगे पाटील यांची भेट घेतली व संवाद साधला. अंबड येथील शासकीय रुग्णालयात जाऊन जखमींची विचारपूस केली. लाठीचार्ज प्रकरणाची सखोल चौकशी करून दोषींवर कारवाई करावी अशी मागणी त्यांनी केली आहे. मराठा समाजाला न्याय मिळावा. त्यांची आरक्षणाची रास्त मागणी आहे. विदर्भात कुणबी म्हणून त्यांना आरक्षण मिळते मग मराठवाड्यातील मराठा समाजाला कुणबी म्हणून आरक्षण का नाही हा आरक्षणाचा प्रश्न सरकारने सोडवावा अशी मागणी त्यांनी केली. औरंगाबाद शहरातून आरक्षणाच्या मागणीसाठी लाखोंच्या संख्येने मोर्चे निघाले कधीच या आंदोलनाला गालबोट लागले नाही मग एका गावात हक्काच्या मागणीसाठी उपोषणात अमाणूषपणे आंदोलकांवर मारहाण केली जाते हे निषेधार्थ आहे. हिच परिस्थिती जाणून घेण्यासाठी राज ठाकरे येत आहे. आगामी लोकसभा निवडणुकीच्या पुर्वतयारीसाठी त्यांनी शहरातील सुभेदारी विश्रामगृह येथे त्यांनी सहा विधानसभा मतदारसंघातील पदाधिकारी यांची बैठक घेऊन मार्गदर्शन केले. यावेळी पत्रकारांशी संवाद साधला असता ते म्हणाले मनसेची निवडणुकीत एकला चलो रे ची भुमिका आहे. पक्ष मजबूत करण्यासाठी प्रयत्न केले जात आहे. आगामी निवडणुकीत जनतेचे आशिर्वाद व समर्थन मिळेल अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. यावेळी मनसे नेते दिलिप बापू धोत्रे, उपाध्यक्ष पाटसकर, जिल्हाध्यक्ष सुमित खांबेकर, सतनामसिंग गुलाटी, अशोक जाधव आदी उपस्थित होते.
राज ठाकरे यांचा दौरा उद्या दिनांक 4 सप्टेंबर सोमवार रोजीचा कार्यक्रम
सकाळी 8:15 वाजता चिकलठाणा विमानतळावर आगमन...
सकाळी 8:45 वाजता आंतरवालि सराटी गावाकडे कारने प्रस्थान
सकाळी 9:30 गावात उपोषण कर्ते आणि जखमी गावकरी यांची भेट
भेट घेऊन 11 च्या सुमारास पुन्हा चिकलठाणा विमानतळावर आगमन
What's Your Reaction?