वंचित बहुजन आघाडीचा उद्याच्या औरंगाबाद बंदला पाठिंबा

 0
वंचित बहुजन आघाडीचा उद्याच्या औरंगाबाद बंदला पाठिंबा

वंचित बहुजन आघाडीचा उद्याच्या औरंगाबाद बंदला पाठिंबा...

औरंगाबाद, दि.3(डि-24 न्यूज) उद्या औरंगाबाद जिल्हा बंदची हाक मराठ आरक्षण समन्वय समितीने  दिला असून या बंदला वंचित बहुजन आघाडीच्या वतीने जाहीर पाठिंबा देण्यात आला आहे वंचित बहुजन आघाडीची जिल्हा कार्यकारिणी बैठक जिल्हा अध्यक्ष योगेश बन यांच्या अध्यक्षतेखाली आज सुभेदारी विश्रामगृह औरंगाबाद येथे संपन्न झाली या बैठकीत जालना जिल्ह्यात मराठा आरक्षणासाठी उपोषणाला बसलेल्या कार्यकर्त्यांच्या समर्थनार्थ एक मोर्चा काढला होता या मोर्चावर पोलिसांनी अमानुष पणे लाठीचार्ज केला ती अत्यंत दुर्दैवी घटना असुन वंचित बहुजन आघाडी औरंगाबाद जिल्ह्याच्या वतीने जाहीर निषेध करण्यात येतो मराठा समाजाच्या वतीने राज्यात जवळपास 58 मोर्चे अत्यंत शिस्तबद्ध पद्धतीने काढण्यात आले आणि एक आदर्श समाजासमोर घालून दिला आहे वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय नेते अँड बाळासाहेब आंबेडकर यांनी दोन दिवसांपूर्वी मराठा समाजाला आरक्षण मिळावे अशी भुमिका घेतली आहे ते आम्ही सत्तेत आल्यावर देऊ अशीही भुमिका घेतली आहे. त्याचं प्रमाणे वंचित बहुजन आघाडी च्या वतीने यापुढील सर्व आंदोलनात सक्रिय सहभाग नोंदवणार आहे अँड बाळासाहेब आंबेडकर यांचा आदेशानुसार उद्या मराठा समाजाच्या वतीने औरंगाबाद जिल्हा बंद ची हाक देण्यात आली असून त्याला आजच्या बैठकीत एकमताने वंचित बहुजन आघाडीच्या वतीने पाठिंबा जाहीर करण्यात आला आहे असे पत्रही सकल मराठा आरक्षण समाजांचे समन्वयकास वंचित बहुजन आघाडीच्या वतीने पत्र सुध्दा देण्यात आले वंचित बहुजन आघाडीच्या वतीने  जिल्हाध्यक्ष योगेश बन, जिल्हा उपाध्यक्ष रुपचंद गाडेकर, जिल्हा उपाध्यक्ष रामेश्वर तायडे, जिल्हा महासचिव मिलिंद बोर्डे,  जिल्हा प्रसिद्धी प्रमुख भाऊराव गवई, जिल्हा कार्यकारिणी सदस्य पी के दाभाडे,  बाबासाहेब वाघ, प्रविण जाधव,  सिध्दार्थ बनकर, रवि रतनपारखे आदी उपस्थित होते यावेळी टिव्ही सेंटर चौकात आंदोलनात सहभागी होऊन हे पत्र देण्यात आले सदरील पत्र मराठा मोर्चाचे समन्वयक पंढरीनाथ गोळसे पाटील, ऍड. साहेबराव पंडित, संजय गायके पाटील, भरत कदम पाटील, माधव दुधाटे पाटील, ऍड. सिरीश काळे पाटील, उदयराज गायकवाड पाटील राहुल पाटील,संजय काकडे पाटील आदींनी वंचित बहुजन आघाडीचे हे पत्र स्विकारले.

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow