उद्याच्या मराठा क्रांती मोर्चाच्या बंदला एमआयएमचा पाठींबा
उद्याच्या मराठा क्रांती मोर्चाच्या बंदला एमआयएमचा पाठींबा
औरंगाबाद, दि.3(डि-24 न्यूज) उद्या शहर आणि जिल्हा बंदची हाक मराठा क्रांती मोर्चाने दिली आहे. या बंदला एमआयएमने पाठिंबा दिला आहे. आपली दुकाने, अस्थापने स्वतः बंद करुन आंदोलनात सहभागी होण्याचे आवाहन प्रसिध्दीपत्रकाद्वारे एमआयएमचे प्रदेशाध्यक्ष तथा औरंगाबादचे खासदार इम्तियाज जलिल यांनी केले आहे.
प्रसिध्दीपत्रकात म्हटले आहे मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी जालना जिल्ह्यातील अंतरवाली सराटी, तालूका अंबड येथे लोकशाही मार्गाने मराठा बांधव आंदोलन करत होते. त्यांच्यावर अमानुषपणे बेछुट लाठीमार आणि गोळीबार करण्यात आला आहे. या प्रकरणी निषेध व्यक्त करण्यासाठी प्रकरणाची उच्चस्तरीय चौकशी आणि दोषी पोलिसांवर कठोर कारवाई होण्यासाठी उद्या 4 सप्टेंबर रोजी मराठा क्रांती मोर्चाने औरंगाबाद शहर व जिल्हा बंद पुकारला आहे. त्या बंदला एमआयएमचा जाहीर पाठिंबा असल्याचे म्हटले आहे. सरकारने मराठा समाजाची मागणी त्वरित पूर्तता करावी अशी मागणी इम्तियाज जलिल यांनी केली आहे.
What's Your Reaction?