संजय केनेकर यांनी घेतली उपोषणस्थळी भेट, जखमिंचीही केली विचारपूस
भाजपा सरचिटणीस संजय केनेकर यांनी घेतली उपोषणस्थळी भेट
जालना, दि.3(डि-24 न्यूज) जालना येथील मराठा समाजाच्या आंदोलनात अंतरवाली सराटी, ता.अंबड येथे भाजपा प्रदेश सरचिटणीस श्री.संजयजी केनेकर यांनी भेट देऊन उपोषणकर्ते श्री.मनोज जरांगे पाटील यांच्या सह आंदोलकांशी संवाद साधला तसेच सविस्तर चर्चा करून यावर सरकार लवकरात लवकर निर्णय घेईल असे आश्वासित केले.
सरकार हे मराठा समाजाच्या आरक्षणाबाबत नेहमीच गंभीर आणि सकारात्मक राहिले आहे. परस्पर सहकार्याने हा संवेदनशील विषय पूर्ण होईल असा विश्वास दिला.
तसेच या घटनेची उच्चस्तरीय चौकशीचे व कारवाईचे निर्देश राज्य शासना कडून देण्यात आले आहेत तसेच शासनानं या प्रकरणाची गंभीर दखल घेतली आहे. यावेळी श्री.संजय केनेकर यांनी मराठा समाज बांधवांना, मराठा संघटनांचे नेते, पदाधिकारी, कार्यकर्ते यांना शांतता राखण्याचे आवाहन देखील केले आहे.
यावेळी....
श्री.सुनील अर्दड, श्री.सर्जेराव जाधव, श्री.जितेंद्र पातरकर , श्री.अंकुशराव बोबडे, श्री.कैलास शेळके, श्री.दीपक ठाकूर, श्री. औदुंबर बागडे, श्री.विजय खटके, श्री.अशोक तारख, श्री.बंडू आरध्ये, श्री.अशोक रोडगे, श्री.रमेश काळे, आदी उपस्थित होते.
What's Your Reaction?