मतीन पटेल यांना न्यायालयात दिलासा नाही, अनधिकृत बांधकाम स्वतः काढून घेण्याची महापालिकेची पुन्हा नोटीस...!

 0
मतीन पटेल यांना न्यायालयात दिलासा नाही, अनधिकृत बांधकाम स्वतः काढून घेण्याची महापालिकेची पुन्हा नोटीस...!

मतीन पटेलला हायकोर्टात दिलासा नाही, घरावर बुलडोजर चालणार का...? स्वतः अनधिकृत बांधकाम काढून घेण्याची पुन्हा निघाली नोटीस...

छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद), दि.12(डि-24 न्यूज )- : एमआयएमचे नगरसेवक मतीन पटेल प्रकरणावरून शहराचे राजकारण पुन्हा तापले आहे. निदा खानला आश्रय दिल्याच्या आरोपानंतर महापालिकेने मतीन पटेल यांच्या घर आणि कार्यालयाला अनधिकृत बांधकामाची नोटीस बजावली होती. मात्र ही नोटीसच बेकायदेशीर असल्याचा आरोप करत मतीन पटेल यांनी न्यायालयात धाव घेतली होती. मात्र न्यायालयात कोणताही दिलासा देण्यास नकार दिला असून नगरसेवक मतीन पटेलला मोठा धक्का आहे.

नाशिक TCS प्रकरणात गुन्हा दाखल झालेले नगरसेवक मतीन पटेल मनपा अतिक्रमण नोटीस विरोधात न्यायालयात गेले होते. मनपाची 3 दिवसाची नोटीस बेकायदेशीर असल्याचे म्हणत न्यायालयाकडे 15 दिवसाचा वेळ मागितला होता. मात्र न्यायालयाने अतिक्रमण कारवाई थांबवण्यास नकार दिला आहे. त्यामुळे मतीन पटेलच्या घरावर कोणत्याही क्षणी कारवाई होण्याची शक्यता आहे.

मतीन पटेलने मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात याचिका दाखल केली होती. यावर आज सुनावणी झाली मात्र खंडपीठाने मतीन पटेलला कोणताही दिलासा दिला नाही. सोबतच कारवाई थांबवण्याबाबत किंवा स्थगिती देणे बाबत देखील कोणताही आदेश दिला नाही. त्यामुळे महानगरपालिकेकडून अनाधिकृत बांधकामावर बुलडोझर चालण्याची शक्यता आहे. मात्र याबाबत अंतिम निर्णय प्रशासन घेणार आहे.

मतीन पटेलच्या घरावर आता बुलडोझर कारवाई होण्याची शक्यता आहे. ज्या घरात निदा होती ते घर बेकायदेशीर बांधले असल्याची नोटीस महापालिकेकडून देण्यात आली होती. 3 दिवसात खुलासा न केल्यास घर पाडण्यात येईल असा इशारा देखील महापालिकेकडून देण्यात आली होता. त्याचबरोबर त्यांचे नारेगाव परिसरातील दुसरे राहते घर आणि नारेगाव परिसरातील त्यांच्या ऑफिसला ही अतिक्रमण केल्या संदर्भातली नोटीस बजावण्यात होती. या नोटीसीविरोधात मतीन पटेलने कोर्टात धाव घेतली होती. मतीन पटेल यांचे वकील अभयसिंग भुसे यांनी माध्यमांना माहिती देताना सांगितले न्यायालयाला सांगितले हि नोटीस सुट्टीच्या दिवशी महापालिकेने काढली आहे. सात दिवसांची मुदत दिली नाही. तीनच दिवसांची मुदत दिली आहे म्हणून हि नोटीस बेकायदेशीर आहे असे म्हटले. पुढील सुनावणी 18 मे रोजी होणार आहे असे त्यांनी सांगितले. परंतु पुन्हा मतीन पटेल यांचे घर आणि कार्यालय अनधिकृत असल्याची नोटीस महापालिकेने काढली आहे. या नोटीसीत 24 तासांची मुदत दिल्याने कार्यवाई होते की काय असे दिसून येत आहे. या नोटीस मध्ये स्वतः अनधिकृत बांधकाम 24 तासांच्या आत काढण्याचे आदेश दिले आहेत.

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow