इम्तियाज जलील यांच्या सोबत पाच उमेदवारांची ओवीसींनी केली घोषणा, डॉ.गफ्फार कादरींचा पत्ता कट...?शहरात चर्चा?
इम्तियाज जलील यांच्या सोबत पाच उमेदवारांची ओवीसींनी केली घोषणा, डॉ.गफ्फार कादरींचा पत्ता कट... शहरात चर्चा?
इम्तियाज जलील यांच्या सहीत पाच उमेदवारांच्या नावांची ओवेसींनी केली घोषणा, डॉ.गफ्फार कादरी यांचा पत्ता कट झाला कि काय शहरात चर्चा, आपल्या भाषणात ओवेसींनी विधानसभा निवडणुकीत इम्तियाज जलील यांना निवडून देण्याचे कळकळीचे आवाहन केले....
छ.संभाजीनगर(औरंगाबाद) दि.9(डि-24 न्यूज) आगामी विधानसभा निवडणुकीत पाच उमेदवारांची घोषणा एमआयएमचे सुप्रीमो खासदार बॅ.असदोद्दीन ओवेसींनी केली आहे. महाविकास आघाडी सोबत युती होते किंवा नाही आता प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहेत. छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद) येथून इम्तियाज जलील, मालेगाव येथून विद्यमान आमदार मुफ्ती इस्माईल, धुळे येथील विद्यमान आमदार फारुख शहा, मुंबईचे अध्यक्ष रईस लश्करीया, सोलापूर येथून फारुख यांच्या नावाची घोषणा आज त्यांनी हज हाऊस येथे आयोजित पत्रकार परिषदेत केली. बाजूलाच प्रदेश कार्याध्यक्ष डॉ.गफ्फार कादरी बसले होते. हि घोषणा करताच त्यांचा चेहरा उतरला. औरंगाबाद पूर्व मतदार संघातून इम्तियाज जलील यांची निवडणूक लढण्यास ते इच्छुक आहेत. तर औरंगाबाद मध्य मधून नवीन चेहरा देण्याची रणनिती पक्षाची असेल. दोनदा डॉ.कादरी यांचा औरंगाबाद पूर्व विधानसभा मतदारसंघातून थोड्या मताने पराभव झाला होता तिस-यांदा त्यांनी तयारी सुरू केली आहे. आज त्यांच्या नावाची घोषणा झाली नाही यामुळे त्यांच्या समर्थकांमध्ये चलबिचल सुरू झाली असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. यानंतर शहरात चर्चा सुरू झाली त्यांचा पत्ता कट झाला कि काय...? असेही होऊ शकते पक्षांकडून त्यांना प्रदेशाध्यक्ष पदाची ऑफर दिली असेल किंवा काही दिवसांनंतर त्यांची दिलजमाई करुन तिकीट दिले जाईल.
D24NEWS English News....
AIMIM announce 5 candidates name for upcoming assembly election
Chhatrapati Sambhajinagar(Aurangabad), Sep 9 AIMIM supremo and party MP Barister Asaduddin Owaisi on Monday announced names of five candidates for upcoming assembly elections in the state.
Whether there was an alliance with the Mahavikas Aghadi or not is now a question mark.
He was in city today to attend a
Tahafuz-e-Awqaf Conference" against Waqf Amendment Bill 2024.
Addressing a press conference after the meeting Owaisi announced the names of state party president and Former MP Imtiaz Jaleel from Aurangabad (East) , Mufti Ismail, sitting MLA from Malegaon, Farooq Shah, sitting MLA from Dhule, Rais Lashkaria, President of Mumbai and Farooq from Solapur constituency.
Name of regional working president Dr. Ghaffar Qadri who also willing to contest election was not announced by Owaisi . So the strategy of the party will be to give a new face from Aurangabad Central.
Dr. Qadri was defeated from Aurangabad East Assembly two times in previous by a narrow margin.
What's Your Reaction?