राजाबाजार जैन मंदिरात पर्युषण महापर्वाची धर्म ध्वजारोहणाने महामस्तकाभिषेकाने सुरुवात
राजाबजार जैन मंदिरात पर्युषण महापर्वाची धर्मध्वजारोहणाने महामस्तकाभिषेकने सुरुवात
छ. संभाजीनगर(औरंगाबाद ), दि.8(डि-24 न्यूज) - खंडेलवाल दिगंबर जैन पंचायत पार्श्श्वनाथ मंदिर राजाबजार येथे दहा दिवसीय पर्युषण महापर्वाची आज धर्मध्वजारोहणाने सुरुवात करण्यात आली. यावेळी प.पु.आचार्य विरागसागरजी महाराज यांच्या संघातील आर्यिका विकुंदनश्रीमाताजी व क्षुल्लिका विजिताश्री माताजी यांच्या सानिध्यात धर्मध्वजारोहन करण्यात आले. यावेळी भगवान शांतीनाथांची जे वर्षभर अभिषेक सेवा करत असतात. तसेच शिखर मंदिरावर भगवान पार्श्श्वनाथांची जे वर्षभर अभिषेक व नित्य नियम पुजा करत असतात अशा भाविकांकडुन धर्म ध्वजारोहन करण्यात आले. यामध्ये संपुर्ण कार्यकम हा नमोकार भक्ती मंडळाच्या साग्र संगीतामध्ये भगवंताचा पंचामृत अभिषेक करण्यात आला. यामध्ये भगवंताचे दहा दिवसीय इंद्र इंद्राणी होण्याचा मान श्रीमती. ताराबाई हिराचंदजी अनिलकुमारजी अमोल राजेश कासलीवाल परिवार हिराकाका यांना मिळाला. तर शांतीमंत्राचा मान किरणकुमार निखीलकुमार गंगवाल परिवार राजाबजार यांना मिळाला तर अर्चनाफळ चढविण्याचा मान निर्मलादेवी प्रकाशचंद छाबडा यांना मिळाला. यावेळी आर्यिका विकुंदनश्री माताजी यांनी उत्त्तम क्षमा या धर्मावर उदबोधन करतांना सांगीतले की, आत्म्यात उत्पन्न होणा-या कोध रुपी विकाराला नाहीसे करणे म्हणजे क्षमा गुण प्रगट करणे होय. क्षमा विरस्य भुषणम, क्षमा करणे हे विर पुरुषांचे तसेच साधु संतांचे भुषण आहे. क्षमा हा आत्म्याचा निज धर्म आहे. जीवाची शुध्द परिणीत व विश्श्व प्रेमाचा अमुल्य ठेवा आहे. राग व्देषाला थारा नाही. मनामध्ये राग धरल्यामुळे शत्रु व वैरभाव वाढतो. हे दुर्गतीचे बीज आहे. क्षमा केल्याने मनुष्याच्या मन वचन आणि काया या सर्वाची शुध्दी होत असते. मनुष्याने कार्याने महान बनतो विचाराने मोठा व्होतो असेही माताजीने सांगीतले.
तदनंतर दुपारच्या सत्रात तत्वार्थ सुत्र या ग्रंथाचे वाचन संपन्न झाले. तसेच संध्याकाळी महाआरती व श्रावक प्रतिक्रमण धार्मिक व सास्कृतिक कार्यकमाने सांगता झाली. तसेच संध्याकाळी भगवंताच्या आरतीने संपुर्ण परिसर भक्तीमय झाला होता. संपुर्ण कार्यकम यशस्वी करण्यासाठी खंडेलवाल दिगंबर जैन पंचायत पार्श्श्वनाथ मंदिर विश्श्वस्थ मंडळ व पर्युषण पर्व समितीने परिश्रम घेतले असल्याची माहिती प्रचार प्रसार संयोजक नरेद्र अजमेरा व पियुष कासलीवाल यांनी एका पत्रकाव्दारे दिली.
What's Your Reaction?