आंतरवालीत रेकाॅर्डतोड सभा, मनोज जरांगे पाटील यांचे सरकारवर गंभीर आरोप, दहा दिवसांचा अल्टिमेटम
आंतरवालीत रेकाॅर्डतोड सभा, मनोज जरांगे पाटील यांचे सरकारवर गंभीर आरोप
मंत्री छगन भुजबळ व गुणरत्न सदावर्तेवर तोफ डागली, आंदोलन थांबविण्यासाठी आरक्षणाचा निर्णय लवकर घेण्याची मागणी, लाखोंचा जनसागर उसळला, रस्त्यावर ट्राफीक जाम.....एक तर माझी अंत्ययात्रा निघेल नाही तर मराठा आरक्षणाची विजयीयात्रा...
आंतरवालीत सराटी, दि.14(डि-24 न्यूज) ऐतिहासिक सभेत मनोज जरांगे पाटील यांनी राज्य सरकारवर गंभीर आरोप केले आहे. मराठा आरक्षणाचे आंदोलन मोडण्याचा डाव असल्याचा आरोप करत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मराठा समाजाला उचकावण्यासाठी मंत्री छगन भुजबळ व गुणरत्न सदावर्तेना वक्तव्य करण्यास सांगितले.
त्यांना माहीत आहे मराठा समाज रागीट आहे त्यांना उचकावले तर ते काहीही करतील याच कारणामुळे आंदोलन मोडून टाकू व त्यांना आरक्षण मिळणार नाही. आता एक इंचही मागे हटणार नाही. शंभर एकरवर सभा घेण्यासाठी सात कोटी कोठून आले असा सवाल भुजबळांनी केला होता तर सदावर्तेनी वक्तव्य केले होते मनोज जरांगे पाटील हे हिंसाचार करु शकतात त्यामुळे त्यांना अटक करण्याची मागणी केली होती. तुम्ही आम्हाला उचकावण्याचा प्रयत्न करु नका उद्रेक होऊ देऊ नका, आरक्षण हिसकावून घेऊ. मराठा समाजाला ओबीसीत सामावून घ्या. सर्व मंत्रीमंडळ पंतप्रधान नरेंद्र मोदी व गृहमंत्री अमित शहा यांना विनंती करतो कायदेशीर आरक्षण मराठा समाजाला देण्यासाठी लवकर निर्णय घ्या. तुमच्या हातात आता दहा दिवस आहे, त्यानंतर चार दिवसांपेक्षा जास्त वाट बघण्याची आमची तयारी नाही, एका महिन्याचा वेळ दिला होता. आरक्षण दिले नाही तर 40 व्या दिवशी सांगू असा गंभीर इशारा जरांगे पाटील यांनी लाखो मराठा समाजाला संबोधित करताना सांगितले. मराठा समाजासाठी गठीत केलेली समिती बंद करा, तुमचं आणि आमचं ठरलं होतं. एका महिन्यात महाराष्ट्रातील मराठा समाजाला कुणबीचे प्रमाणपत्र द्या आणि ओबीसीत समावेश करा अशी मागणी आपल्या भाषणात जरांगे पाटील यांनी केली आहे.
या सभेला तुफान गर्दी मराठा समाजाची बघायला मिळाली. यावेळी शांततेत सभा संपन्न झाली. शिस्तीचे दर्शन घडले. रस्त्यावर चार चाकी गाड्यांची लांबच लांब रांगा दिसत होते. लाखोंचा जनसमुदाय, नियोजन चांगले बघायला मिळाले.
What's Your Reaction?