अल्पसंख्याक समाजाला विधानसभेत 30 जागा देण्याची मागणी...!

 0
अल्पसंख्याक समाजाला विधानसभेत 30 जागा देण्याची मागणी...!

अल्पसंख्याक समाजाला विधानसभेत 30 जागा देण्याची मागणी

छ.संभाजीनगर(औरंगाबाद) दि.14(डि-24 न्यूज) आगामी विधानसभा निवडणुकीत ऑल इंडिया उलमा बोर्डाने अल्पसंख्याक समाजाला प्रतिनिधित्व देण्याची मागणी केली आहे. 30 विधानसभा मतदारसंघातून अल्पसंख्याक उमेदवार देण्यात यावे अशी मागणी महाविकास आघाडी व महायुतीकडे केली आहे. लोकसभा निवडणुकीत राज्यात एकही उमेदवार राजकीय पक्षांनी दिले नसल्याने समाजात नाराजी आहे. मतदार यादीत जास्तीत जास्त पात्र मतदारांनी आपली नावे नोंदवावी व मतदार यादीत आपले नाव आहे का तपासून घ्यावे यासाठी राज्यात जनजागृती करणार आहे.

शिवसेना(उबाठा), राष्ट्रवादी शरदचंद्र पवार, काँग्रेस व भाजपा, राष्ट्रवादी (अजित पवार गट), शिंदे गट या पक्षांच्या वरिष्ठ नेत्यांची भेट घेऊन चर्चा करून अल्पसंख्याक समाजाला प्रतिनिधित्व देण्याची मागणी करणार आहे. मागणीवर विचार केला नाही तर रस्त्यावर उतरून आंदोलन करणार असल्याचा इशारा पत्रकार परिषदेत बोर्डाचे कार्यवाहक राष्ट्रीय अध्यक्ष मौलाना नौशाद अहमद सिद्दीकी व राष्ट्रीय सरचिटणीस मौलाना बुंनई हसनी यांनी दिला आहे.

त्यांनी पुढे सांगितले ऑल इंडिया उलमा बोर्ड समाजाच्या प्रश्नांसाठी जनजागृती करत असतो. कोणत्याही राजकीय पक्षांशी सलग्न संघटना नाही. 

राज्यात 11 टक्के मुस्लिम अल्पसंख्याक समाजाची लोकसंख्या आहे. लोकसभा निवडणूकीत महाविकास आघाडीच्या बाजूने समाज उभा राहिला त्यामुळे परिणाम समोर आहे. समाजाचे प्रश्न विधानसभेत मांडण्यासाठी जास्तीत जास्त आमदार निवडून जावे अशी भावना संघटनेची आहे.

यावेळी डॉ.नदीम उस्मानी, डॉ.अब्दूल कादीर सय्यद, शेख फैसल इक्बाल मुतवल्ली, शेख आसेफ, मौलाना महेफुजुर्रहमान कासमी, मौलाना लुकमान कादरी, मुबीन सिद्दीकी, हाफीज शेख इम्रान, हाफिज फरीद खान, मुफ्ती हस्मतउल्लाह कासमी, कारी अब्दुल रशीद, अ.जब्बार अन्सारी आदी उपस्थित होते.

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow