माणुसकी वृध्द सेवालयाचे नवीन वास्तूत थाटात उद्घाटन

माणुसकी वृध्द सेवालयाच्या नवीन वास्तूचे अप्पर पोलिस अधीक्षक सुनिल लांजेवार व सिनेअभिनेते प्रकाश भागवत यांच्या हस्ते उद्घाटन....
याप्रसंगी रक्तदान शिबिरात 11 दात्यांनी रक्तदान केले
छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद), दि.30(डि-24 न्यूज) सु-लक्ष्मी सेवाभावी संस्था संचालित माणुसकी वृद्ध सेवालयाच्या नूतन वास्तूचे उद्घाटन अप्पर पोलिस अधीक्षक सुनिल लांजेवार व प्रसिद्ध मराठी सिनेअभिनेते प्रकाश भागवत यांचे हस्ते करण्यात आले. या कार्यक्रमाच्या सुरवातीला दीपप्रज्वलन करण्यात आले. संत गाडगेबांबांचे प्रतीमापुजन करुन या कार्यक्रमाची सुरवात करण्यात आली. यावेळी शासकीय रक्त पेढीसाठी भव्य रक्तदान शिबीर घेण्यात आले. यामध्ये 11 दानदात्यांनी रक्तदान केले.
प्रमुख पाहुणे म्हणून सुनिल लांजेवार अप्पर पोलीस अधीक्षक संभाजीनगर ग्रामीण, प्रकाशजी भागवत येड्याची
जत्रा फेम, तथा हास्य कलाकार,
भारत सोनवणे (माजी अधिष्ठाता घाटी),
समाजसेवक धोंडीरामसिंह राजपूत, सुनिल कोटकर, संजय खंडागळे पोलीस उपनिरिक्षक, चिकलठाणा ,मुक्ताराम गव्हाणे, पूनम चव्हाण, धनंजय वैष्णव,
देविदास पंडीत हे होते. माणुसकी समुहाच्या वतीने प्रमुख पाहुण्यांचा सन्मानचिन्ह प्रशस्तिपत्र देवून विषेश सन्मान करण्यात आला. यावेळी उपस्थितांना मार्गदर्शन करतांना सिनेअभिनेते प्रकाश भागवत म्हणाले कि "जे का रंजले गांजले त्यासी म्हणे जो आपुले,"तोची साधु ओळखावा देव तेथेची जानावा या अभंगाच्या ओळी प्रत्यक्षात रंजल्या गांजल्यांची सेवा करुन खऱ्या अर्थाने समाजातील तरुणांना दिशा देण्याचे कार्य सुमित व त्यांची पत्नी पुजा पंडीत हे करत आहेत. सुमित सारखे प्रामाणिक सेवा करणारे लोक जगात खुप कमी आहेत. ते राबवत असलेले समाजउपयोगी विविध उपक्रम राबवणे येर्या-गबाळ्याचे काम नाही. स्वतःच्या व्यावसाय सांभाळून निराधारांसाठी झटणे त्यांचे पुनर्वसन करुन त्यांना समाजाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी ही मंडळी स्वतःच्या संसाराची राखरांगोळी करुन काम करतात. पूजा व सुमितचे समान विचार समाजासाठी झटण्याची इच्छा शक्ती एवढ्या कमी वयात निर्माण होणे हे दुर्मिळ असते, गेल्या आठ वर्षांपासून मी सुमितचे काम स्वतः अनुभवले आहे .
समाजासाठी झटण्याची एवढी अफाट इच्छा शक्ती, जिद्द खरच वाखाणण्याजोगी आहे. आम्ही सदैव सुमित व पूजा पंडीत यांच्या सोबत आहोत या प्रसंगी सिनेअभिनेते प्रकाश भागवत म्हणाले की येणाऱ्या काळात सुमित तूच खरा सेलेब्रेटी ठरणार आहेस. ह्या प्रसंगी त्यांनी समाजात दुःखी लोकांच्या चेहऱ्यावर हास्य कसे निर्माण करता येईल याचे मार्गदर्शन केले. या कार्यक्रमात प्रा.धोंडीरामसिंह राजपूत यांनी संत गाडगेबाबांच्या वेषभूषेत उपस्थितांना स्वछतेचे महत्त्व पटवून सांगितले. ज्युनियर चार्ली सोमनाथ स्वभावणे यांनी आपल्या मुख अभिनयातुन रक्तदानाचे महत्व पटवून दिले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी भारुडरत्न केरे महाराज, प्रा.शरद सोनवणे,
सोमनाथ स्वभावणे, सुनिल चव्हाण, उमाकांत वैद्य, सुदाम पवार, किशोर पवार, गनेश जाधव (मंडप),
बंडु राठोड, अरुण चव्हाण, मिराबाई पंडित
पुजा पंडित, संध्या पारवे, लक्ष्मी पंडित यांनी परिश्रम घेतले.
मेल्यानंतर खांदा देण्यापेक्षा जीवंत माणसांना मदतीचा हात द्या- अप्पर पोलीस आधीक्षक सुनील लांजेवार यांचे प्रतिपादन....
माणुसकी वृध्द सेवालयाच्या उद्घाटन प्रसंगी उपस्थीतांना मार्गदर्शक करतांना
सुनिल लांजेवार यांनी सांगितले की दहाव तेराव घालुन शोक व्यक्त करण्यापेक्षा जिवंतपणी आई वडिलांचा सांभाळ करा.
ध्येयवेडा- सुमित पंडित...
स्वतःच्या कुटुंबासाठी आपण सर्वजण काम करत असतो. परंतू दिनदुबळ्यांना,
अनाथांचा नाथ समाजात कोणीही होतांना दिसत नाही. परंतु ध्येय वेडा सुमित पंडित हा अनाथांसाठी मोलाचे कार्य करत आहे.
सर्वसामान्य माणसांना सांभाळणे सोपे असते परंतु मनोरुग्णांना सांभाळून आगळावेगळा आदर्श सुमित पंडित यांनी निर्माण केला आहे. त्यांच्या या कार्याला खांद्याला खांदा लावून सुमित यांची पत्नी सौ. पुजा पंडित या मोलाची साथ देत आहेत. पती पत्नी, आई वडील स्वतःसाठी न जगता या अनाथाचे नाथ झाले आहेत. जीवनातील सुख या वृध्द सेवालयातील लोकांची सेवा करण्यात मानतात. तुम्ही आम्ही वेळ देवू शकत नाहीत. पण थोडाफार मदतीचा हात नक्कीच देवू शकतो. ध्येयवेडे होऊन समाजाप्रती काम करणारी सुमित व पुजा सारखी मंडळी बोटावर मोजण्याइतकेच समाजात शिल्लक आहेत. आपणही खारीचा वाटा म्हणून समाजाचे काही देणे लागतो या भावनेने मदतीसाठी पुढे यावे केले प्रतिपादन या प्रसंगी सुनिल लांजे
वार यांनी केले.
What's Your Reaction?






