सर्वांनी पर्यावरण पुरक गणेशोत्सव साजरा करावा - मनपा आयुक्त जी श्रीकांत

मिलेनियम पार्क गणेश मंडळाचे मूर्ती विसर्जन कॉलनी मध्येच होणार...
सर्वांनी पर्यावरण पूरक गणेशोत्सव साजरा करावा - प्रशासक जी श्रीकांत
छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद), दि.5 (डि-24 न्यूज) -
मिलेनियम पार्क गणेश मंडळाच्या वतीने दररोज वेगवेगळ्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येत आहे.
यामध्ये रोज एका इमारतीतील रहिवाशांना देवी देवतांची थीम देऊन त्यावरील नृत्य नाटिका सादर करण्यासाठी सांगण्यात आले होते. त्या अनुषंगाने राम सीता, विष्णू लक्ष्मी, महादेव पार्वती, गणेश जी, श्री कृष्ण लीला, यासारख्या अनेक थीम देण्यात आल्या या थीम वर रहिवाशांनी विविध नाटिकांचे सादरीकरण केले.
आज छोट्या बालकांसाठी कुकिंग कॉम्पिटिशन ठेवण्यात आले होते. त्याचे उद्घाटन मनपा आयुक्त जी श्रीकांत यांच्या हस्ते झाले.
त्यांनी याप्रसंगी सर्व बालकांच्या स्टॉलला भेट देऊन बालकांचे कौतुक केले व मिलेनियम पार्क मध्ये सुरू असलेल्या वेगवेगळ्या उपक्रमाबद्दल गणेश मंडळाला शुभेच्छा दिल्या.
याप्रसंगी मंडळाची गणेश मूर्ती शाडू मातीची असल्यामुळे गणेश मूर्तीचे विसर्जन कॉलनी मध्येच मोठ्या पाण्याच्या टाकीत करण्यात येणार आहे. अशी माहिती सोसायटी अध्यक्ष संजीव सोनार यांनी दिली. याप्रसंगी गणेश मंडळाचे अध्यक्ष एडवोकेट ऋतुराज पाटील, मनपाचे उप आयुक्त अंकुश पांढरे , राजीव कामत, एडवोकेट शुभम काकडे, पंकज खंडेलवाल, महिंद्र तातेड, निरंजन समदानी, भिकमचंद मल, रामभाऊ काळे, मयुरी वडगावकर, रश्मी नायडू आदी उपस्थित होते.
What's Your Reaction?






