माजी नगरसेविका सलमा बानो यांचे निधन...!
माजी नगरसेविका सलमा बानो यांचे निधन...!
छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद), दि.3(डि-24 न्यूज)- रविंद्र नगर येथील रहिवासी सलमा बानो मीर मोहम्मद अली यांचे आज हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने निधन झाले. त्यांचे वय अंदाजे 57 वर्षे होते. ते सतत सामाजिक व राजकीय क्षेत्रात सक्रिय असल्याने समाजात प्रतिष्ठा प्राप्त केली होती. राजेंद्र दर्डा मंत्री असताना काँग्रेसने त्यांना स्विकृत सदस्यपदी निवड केली होती. तेव्हापासून ते धर्मनिरपेक्ष पक्षांसोबत सक्रीय होते. सध्या राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षात प्रदेश पदाधिकारी होते. त्यांची नमाज ए जनाजा बाद नमाज जोहर पीर गैब साहाब मस्जिद मध्ये अदा करुन तेथील कब्रस्तानात दफनविधी करण्यात आला. त्यांच्या पश्चात दोन मुले, सूना, नात नातू असा मोठा परिवार आहे.
What's Your Reaction?